मागील तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या वेडसर व्यक्तिस कुटुंब भेट घडवित केले कुटुंबाच्या स्वाधीन
मुकेश शेंडे तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंदेवाही दिनांक 27 मार्च सोमवार हा दिवस सिंदेवाही शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवनारा ठरला. पुन्हा एकदा युनुसभाई शेख़ सामाजिक कार्यकर्ता तथा सिंदेवाही नगर पालिकेचे नगर सेवक, अध्यक्ष निराश्रीत- निराधार लोकसेवा प्रकल्प सिंदेवाही यांच्या द्वारे सामाजिक बांधीलकी जपत आज त्यानी पुन्हा एक वेडसर व्यक्तीची त्याच्या कुटुंबा भेट घडवून आणून देत सामाजिक एकतेचा आणि मानुसकिचा संदेश दिला.
एकीकडे समाजात सामाजिक विघटनात्मक परिस्थीती काही संधि-साधु षड्यंत्र रचत सामाजात तिरस्कारित दुफळी निर्माण करीत असल्याचे आपणास दिसून येत आहेत अश्याही परिस्थीतीत युनुसभाई शेख़ सारखे व्यक्तीमत्व सामाजिक बांधीलकीची बीजे समाजात रोऊंन सामाजीकी करणाचा संदेश आपल्या सेवाभावी कार्याच्या माध्यमांतून मानवी समाजात देत आहेत. वास्तविकतः खरेच त्यांच हे कार्य अतुलनीय असून आजच्या समाजास आणि तरुणाईला प्रेरणा देणारेच आहे.
मागील जानेवारी महिन्यात नवरगांव मार्गाने येत असताना रामेश्वर बाबूलाल यादव ही वेडसर व्यक्ति त्याना अचानक येणाऱ्या पावसात भीजत आहे आणि एका झाडाच्या आश्रयाने अभी असून ठंड़ीने कांपत आहे ऐसे दिसताच त्यानी या व्यक्तीस सर्व प्रथम आपल्या गाडीतिल जॉकेट त्याच्या अंगावर टाकले आणि त्याला आपल्या चारचाकी वाहनाने सिंदेवाहीला आणले तसेच लगेच त्याला देवा पान सेंटर या ठिकाणी गरम चाहा दिला आणि त्याला नवीन बसस्थानक इथे झोपवून घरून त्याला जेवनाचा डबा आणून त्याची भूक भागविली त्यानंतर हळू-हळू त्याच्या स्वभावाचा अभ्यास करीत रामेश्वर या वेडसर व्यक्तीशी जवळीक साधली आणि सातत्याने मागील दोन महिन्या पासुन त्याची जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला, या पुन्यस्वरू कार्यात त्याना त्यांचे सहकारी जावेद पठान, वासुदेव आलेवार यानी सुद्धा सहकार्य केले.
पुढे त्याच्या राहण्याची आणि झोपण्याची व्यवस्था करीत त्याच्याशी बोलन्यास सुरुवात करीत त्याचा विश्वास संपादन केला आणि एके दिवशी त्याचा नाव आणि पता माहीत करण्याचा अपयशी प्रयत्न केला. परंतु हिम्मत न हारता त्याची सेवा सुरुच ठेवत त्याला स्नान वगैरे करुण देत पुन्हा आपल्या पद्धतीने त्याच्या कडून काही माहीती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या गावकडील पोस्ट पिन क्रमांक माहीत करीत त्याच्या गावाची माहित्ती प्राप्त केली तेव्हा लक्षात आले की, सदर वेडसर व्यक्ती ही, छत्तीसगड़ राज्यातील दुर्गम भागातील गाव बेलाकसा हे असून बेलगहना तहसील जिल्हा बिलासपुर येथील रहिवासी आहे. अशी पक्की माहीती प्राप्त झाली, तसेच नेहमी प्रमाणे आपले बौद्धिक चातुर्याचा वापर करीत रामेश्वर यादव याच्या कुटुंबाशी संवाद साधला तेव्हा कळले की संबंधित व्यक्ती ही सिंदेवाही पासुन हजारो किमी अंतरावरील आहे. पुढे त्याचे मित्र-भाऊ आणि पत्नीशी तसेच बेलगहनाचे पोलिस निरीक्षक यांचेशी मोबाइलच्या माध्यमातुन संपर्क साधत त्यांच्या कुटुंबाशी वार्तालाप केला आणि तब्बल तीन वर्षापासुन आपल्या कुटुंबाशी दुर असलेल्या या वेडसर व्यक्तीस आज दिनांक 27-मार्च-2023 रोजी सिंदेवाहि पोलिस स्टेशनचे पोलिस उप-निरीक्षण सागरजी महल्ले यांच्या मार्गदर्शनात रामेश्वर बाबूलाल यादव या वेडसर व्यक्तीस त्याचे कुटुंबातून आलेली त्याची पत्नी सविता रामेश्वर यादव, भाऊ तिलक यादव, प्रवेश यादव सह इत्यादि नातेवाइकांच्या उपस्थीतीत रमजान महिन्याच्या आणि चैत्र नवरात्री सह राम-जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर रामेश्वर यादव या वेडसर व्यक्तीस त्याची अर्धांगिणी सविता यादव आणि भावांचे स्वाधीन केले.
अश्या पद्धतीने युनुसभाई शेख़ यानी आजपर्यंत 27 (सत्तावीस) वेडसर व्यक्तीना त्यांच्या कुटुंबा पर्यंत पोहचवीले असून अविरत वेड्यांची सेवा करणारा ध्येयवेडा म्हणून त्यांचे हे समाजकार्य मानव सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आणि मानव धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म म्हणून सेवा कार्य सुरुच राहनारे असून आज पुन्हा एकदा त्यांच्या या सेवाभावी स्तुतीपर्य उपक्रमाची चर्चा शहरात आदर्श संदेश देनारि आणि इतराना मार्गदर्शन ठरावी अशीच आहे.