वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातील एका अल्पवयीन मुलीबरोबर संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला 50 हजार रुपयांमध्ये मध्यप्रदेश येथे विकण्यात आले. या 14 वर्षीय मुलीची विक्री केल्या नंतर तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. दरम्यान या अल्पवयीन मुलीला पुण्यातून पळवून नेऊन विकणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
काय आहे घटना…
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीची पुणे पोलिसांनी मध्यप्रदेश येथे जाऊन सुटका केली आहे. शांती उर्फ सांतो हरनाम कुशवाह वय 40 वर्ष आणि धर्मेंद्र यादव वय 22 वर्ष असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीची मोठी बहीण पुण्यातील एका वर्कशॉपमध्ये काम करत होती. त्यावेळी या तरुणीची ओळख शांतीशी झाली. शांतीने या तरुणीला तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न लावून देते असे खोटे आश्वासन देऊन तिला मध्यप्रदेश येथे नेले.
आरोपी शांती ने तिला मध्यप्रदेश येथे नेल्यानंतर पैशाच्या मोहापायी 50 हजार रुपयांमध्ये या अल्पवयीन मुलीचा सौदा केला. त्यानंतर तिचा जबरदस्तीने धर्मेंद्र यादव या अरोपिशी लग्न लावून दिले.
आगोदर आरोपी धर्मेंद्र यादवने लग्नासाठी एक मुलगी शोध त्यानंतर मी तुला पैसे देतो अस शांतीला सांगितल्याने त्यानंतर शांतीने हा सर्व प्रकार केला. पोलिसांनी या तरुणीचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश गाठले आणि आरोपींना अटक केली.