✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 29 मार्च बुधवार रोजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य तर्फे पं.दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन रा.सुं.बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट, जि.वर्धा येथे करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांमध्ये 2000 पेक्षा जास्त पदाकरिता दहावी, बारावी, पदवी, पदविका, ऍग्रीकल्चर पदवी, पदविका इंजिनियरिंग, आय.टी.आय. इत्यादी सर्वप्रकारच्या पात्रता धारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी शिल्पा सोनाले उपविभागीय अधिकारी हिंगणघाट, प्रकाश देशमाने उपयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय नागपूर उषाताई थूटे अध्यक्ष ग्रामीण विकास संस्था हिंगणघाट, निता औघड सहाय्यक आयुक्त (जिकोवमाके) वर्धा, सुरज रहाटे प्राचार्य शासकीय औद्योगिक शिक्षण प्रशिक्षण संस्था हिंगणघाट, प्रेम बसंतानी, कवीश्वर इंगोले, संजय डेहने, आकाश पोहाणे, सोनू पांडे, आशीष पर्बत, सुनील डोंगरे, संजय माडे, विनोद विठाळे, विक्की बारेकर, अनिल गहेरवाल, मुन्ना त्रिवेदी, नलिनी सलाम, अनिता मावळे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.