मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर/गडचिरोली:- चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकालीच्या यात्रेला चैत्र शुद्ध षष्ठी सोमवार पासून सुरुवात झालेली असून या यात्रेच्या पहिल्या दिवशीच्या मुख्य पूजेला येथील गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम यांच्या विनंतीला मान देऊन भारत राष्ट्र समितीचे नेते, आविसचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी सपत्नीक उपस्थित राहून मातेची दर्शन घेतले व यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर यात्रेला व देवीची घटस्थापना कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
चंद्रपूर येथे चैत्र शुद्ध षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येत असतो.या यात्रेला आंध्रप्रदेश, तेलंगणा,छत्तीसगड, मराठवाडा आणि महाराष्ट्रातुन लाखो भाविक येत असतात. विशेष म्हणजे चंद्रपुरात शेकडो वर्षे गोंड राजांचं राज्य होता.गोंड राजांची आराध्य दैवत ही माता महाकाली होती. सहाजिकच जी राजांची आराध्य दैवत होती तीच इथल्या प्रजेची आराध्य दैवत झाली. त्यामुळेच आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड महाराष्ट्र व मराठवाडा भाग धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या या माता महाकाली सोबत जोडल्या गेले आणि त्यामुळेच महाकाली मातेच्या या नवरात्रीला अतिशय महत्व असतो.
दरवर्षी या यात्रेची सुरुवात व देवीची घटस्थापना कार्यक्रम येथील गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम यांच्या उपस्थितीत संपन्न होत असते.यावर्षी महाकाली देवींच्या नवरात्र उत्सवाच्या व घटस्थापना कार्यक्रमाला येथील गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम यांनी अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांना सपत्नीक उपस्थित राहण्याचे निमंत्रित दिले होते. चंद्रपूरचे गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम यांच्या निमंत्रणाला मान देत माजी आमदार आत्राम यांनी सपत्नीक उपस्थित राहून माता महाकालीचे दर्शन घेतले. व माजी आमदार आत्राम दांम्पत्याच्या प्रमुख उपस्थितीत या यात्रेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम व त्यांची पत्नी, वडील चंद्रशहा आत्राम, आई प्रियादेवी आत्राम, बहीण महेश्वरी आत्राम, भाऊ गोलू आत्राम, भाऊ महेंद्र आत्राम सोबत भारत राष्ट्र समितीचे नेते, आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम, माजी जि.प.सदस्या अनिता दिपक दादा आत्राम, माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख, विनोद कावेरी तसेच रवी मेश्राम, मोंटी पेंदाम, शंकर मडकाम, सुनीता वेडाम, मंगल भडिकर, सुवर्णा मडावी, नंदू मेश्राम, विठ्ठल कुमरे, साईराम मडावी, अशोक उईके व मंदिर कमेटीचे पदाधिकारी सह भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348