✒️मंगेश सावरकर, मध्य नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन नागपूर:- नागपूर येथे शासना मार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या स्वस्त धान्याच्या मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप युवासेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. अशा काळाबाजार करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी युवा सेना तर्फे अन्न धान्न वितरण अधिकार नागपूर भास्कर तायडे यांना निवेदन देण्यात आहे.
नागपुर शहरात एफसिआय (F C I) गोडाऊन आहे. ज्या राशन दुकानदाराला नागरिकांना वितरणसाठी माल (अन्न धान्न) दिले जाते. पण राशन दुकानदार या पैकी काहीच अन्न धान्न नागरिकांना वितरण करण्यासाठी घेऊन जातो. बाकीचे स्वस्त धान्य गोडाऊन मध्येच सोडून देतो. त्यानंतर गोडाऊन मध्ये सोडलेला माल राशन दुकानदार द्वारा ते एक गाडीत मध्ये भरून राशन दुकानदार व अधिकारी यांच्या समतीने त्या राशन मालची काळाबाजारी केली जाते. अशी माहिती युवा सेना तर्फे देण्यात आली.
नागपूर शहरात जेवढे ही राशन अन्न धान्न वितरण कार्यालयात सरकारी कर्मचारी ऐवजी खाजगी कर्मचारी काम करत आहे. त्यांना कोणत्या जीआर नुसार कामावर ठेवण्यात आले आहे, त्यांना पगार कोण देतात, त्यांना सर्व प्रकारचे अधिकार कोणी दिले रजिस्टर मेंटेनन्स पासून तर कॉम्पुटर ऑपरेटिंग पर्यंत व धान्याची उलाढाल पर्यंतचे अधिकार कोणी दिले? अशा खाजगी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आज शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या प्रमाणात धान्याची काळाबाजार करून जनतेला उपवासी ठेऊन आपण तुपाशी मजा मारत आहे. त्यामुळे युवा सेना (ठाकरे गट ) यांनी केले आहे. व युवा सेना तरर्फे (अन्न धान्न वितरण अधिकार नागपूर भास्कर तायडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यां प्रसगी शरद सरोदे, उपजिल्हा अधिकारी मुल्ला सिंग, जिल्हा समन्व्यक सोनू सिंग गौर, छोटू राऊत, पंकज अहिरावर, बबलू सिंग, अविनाश लोखंडे, प्रवीण अहिरराव, संतोष ठाकूर सह शेकडो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, युवा सेना व महिला सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348