✒️ संदिप सुरडकर नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन नागपूर :- नागपूर जिल्हा इथील महादुला नगर पंचायत (कोराडी) सर्वात मोठा होल सेलर किणारा दुकानात क्राईम ब्रांच युनिट 2 ची शुक्रवार ला सायंकाळी 4.30 ला गुप्त सूचनेच्या आधारावर धडक कारवाई केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली.
खंडेलवाल किराणा दुकानातून किराणा मालाच्या आडून महाराष्ट्रत प्रतिबंध असलेल्या सुघंधित तंबाकू गुटका खंडेलवाल किराणा दुकानात विकत आहे. आणी महादुला ते मधप्रदेश पर्यंत किराणा सोबत सुघंधित तंबाकू गुटका विकत असल्याची माहिती गुप्त पणे क्राईम ब्रांच युनिट 2 ला मिळाली यां गुप्त सुचने च्या आधारावर क्राईम ब्रांच युनिट 2 ने धाड टाकून कारवाई केली. या कारवाई सुघंधित तंबाकू 500 ग्राम चे 32 डब्बे आणी 40 ग्राम चे 610 पैकेट क्राईम ब्रांच युनिट 2 नी जप्त केले. जप्त केलेल्या किमान किमंत 53,740 रूपये येवढी आहे. क्राईम ब्रांच ने यां केस मध्ये खंडेलवाल किराणा दुकानात बसलेले मालक अमित शिवराव खंडेलवाल 45 वर्ष रा. शिवाजी नगर महादुला कोराडी निवासी यांना ताब्यात घेऊन. कोराडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद करण्यात आली आहे.
पण महाराष्ट्रात सुघंधित तंबाकू व गुटका विक्री स सक्त मनाई असून सुधा खंडेलवाल यांच्या किराणा दुकानात सुघंधित तंबाकू व गुटखा विकण्याची माहिती शेवटी कोणी दिली?.. की कोणत्या व्यापाऱ्याने तर ही माहिती नाही दिली अशी खळबळ जनक माहिती कोराडी क्षेत्रात प्रसार झाली. खंडेलवाल किणारा दुकानात असा काळाबाजारी महादुला कोराडी मध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.