उमेश इंगळे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नांदेड:- ज्या महामानवाने जीवन भर कधी दारु किंव्हा इतर व्यसन केले नाही. ज्यांनी भारत देशाला संविधान देऊन लोकशाहीचा पाया रचून सर्वांना मूलभूत अधिकार दिला पण आज नांदेड येथील रेल्वे स्टेशन जवळ असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोरील तांडा बियर बार सुरू करून दिवसाढवळ्या त्यांचा अपमान करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या बीयर बार विरोधात जोरदार आंदोलन सुरू केले होते.
नांदेड येथील रेल्वे स्टेशन जवळ असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोरील तांडा बियर बार तात्काळ हटविण्यात यावे या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी मनीष भाऊ कावळे यांच्या नेतृत्वात बहुजन समाज पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्या धरणे आंदोलनाला भीम टायगर सेनेने जाहीर पाठिंबा दिला होता. तसेच धरणे आंदोलनास वारंवार भेट देऊन सहभाग नोंदविला होता. तसेच दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वात भिम टायगर सेना नांदेड जिल्हा व शहर शाखेच्या वतीने मराठवाडा, जिल्हा व शहर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते.
डॉ.आंबेडकर यांच्या पुतळा समोरील तांडा बिअर बार तात्काळ हटविणे हे कसे संविधानिक आहे हे प्रत्यक्ष चर्चा करून पटवून दिले होते. तात्काळ तांडा बियर बार हटविण्याचे मागणी लेखी निवेदनाद्वारे केली अन्यथा गंभीर परिणामास तयार राहा असे जिल्हाधिकाऱ्यास प्रत्यक्ष सांगितले होते. आज प्रत्यक्षात प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील तांडा बियर बार हटविण्यास सुरुवात झालेली आहे.