पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
शिवाजीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ३०/०३/२०२३ रोजी पहाटे ०५/०० वाजता सहा पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे आणि पोलिस उप निरिक्षक अर्जुन नाईकवाडे हे राजगस्त दरम्यान त्यांचेकडील स्टाफसह शिवाजीनगर पोलीस ठाणे त श्री रामनवमी जयंतीच्या अनुषंगाने तसेच मा. वरीष्ठ अधिकारी यांनी अवैध दारू विक्री, साठा, वाहतुक करणा-या इसमावर प्रतिबंध घालण्याचे तसेच कारवाईच्या अनुषंगाने आदेशित केलेने त्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलिस नाईक सुरेंद्र साबळे यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, “एका पांढ-या रंगाच्या पीक अप टेम्पो गाडी क्रमांक एम एच १२ एम व्ही ३३८७ यामध्ये गावठी दारू घेवुन वाहतुक करण्यात येत आहे आणि तो गाड़ी शिवाजीनगरच्याच दिशेने येत आहे.” अशी खामीशिर माहीती मिळाल्याने सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने यांना कळविली असता, त्यांनी सदर ठिकाणी जावून खात्री करून कारवाई करवात आदेशित केले. त्यानंतर तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक भोलनाथ अहिवळे आणि पोलिस उप निरिक्षक अर्जुन नाईकवाडे हे स्टाफसह संचेती चौक शिवाजीनगर पुणे येथे रवाना होवून तेथे सापळा रचुन सदर ठिकाणी वरील वर्णनाचा टेम्पो मिळून आलेनंतर टेम्पोचालकास त्याचे ताब्यातील टेम्पोसह ताब्यात घेवून, विश्वसात घेवून माहीती घेतली असता, त्याने त्याचे नाव विवेक बदलू यादव वय ३८ वर्ष, राहणार रामदरा रोड, बल्लाळ वस्ती, लोणी काळभोर ता हवेली जि पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने टेम्पोमध्ये अवैध गावठी दारु हो विक्रीकरीता घेवून जात असलेचे सांगितले.
टेम्पोचालक इसम नामे विवेक बदल यादव वय ३८ वर्ष राहणार रामदरा रोड, बल्लाळ वस्ती, लोणी काळभोर ता हवेली पुणे हा दिनांक ३०/०३/२०२३ रोजी सकाळी ०६/०० वा चे सुमारास पोस्ट ऑफिस समोर सगो वर्ष चौक, जे एम रोड लगत शिवाजीनगर पुणे येथे तयार गावठी दारू ही प्लास्टीकच्या कॅन्डमध्ये भरुन विनापरवाना, अनाधिकाराने बेकायदेशीररित्या जवळ बाळगुन विक्री करण्याकरीता त्याच ताम्यातील वाहनातून घेवून जात असताना आढळुन आलेने वरील नमुद इसमाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६७/२०२३ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ)नुसार गुनार नोंद करणेत आलेला आहे.
सदर आरोपीकडून दाखल गुन्हयाचे पुरावेकामी ८०,०००/- रुपये किसी गावठी दारू आणि २,५०,०००/- रुपये किंची एक पीकअप गाडी असा एकूण ३,३०,०००/- किमतीचा मुददमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. सन्दीपसिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परि-०१, पुणे शहर, मा. गजानन टोम्पे, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम मोड़, सहा पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलिस उप निरिक्षक अर्जुन नाईकवाडे, धनाजी जाधवराव, पोलीस अमलदार सुरेंद्र साबळे, रणजित फडतरे, बशीर सय्यद रमेश राठोड, मिलिंद काळे, विकास सराफ, शिवा कांबळे तसेच वाहतूक शाखेचे परशुराम पढ़वाल यांनी केलेली आहे.