राजाराम येथे पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
मधूकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- सर्व गोंडीयन बांधवांनी वीर बाबुराव शेडमाके यांचे विचार घराघरात पोहोचवून त्यांचे विचार आत्मसात करावे तसेच शेकडो वर्षापूर्वी जल, जंगल, जमीन व सावकारी व्यवस्था, ब्रिटिश राजवटी विरोध लढत देशांच्या स्वांतंत्रतासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.ते अहेरी तालुक्यातील राजाराम येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व सल्ला गांगरा वार्षिक सोहळा कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. त्याच्या आज आपण या ठीकाणी पुतळा उभारला आहो त्याच्या एकाच उद्देश्य आहे, आपला इतिहास कूठेही लिहलेली नसून गायब करण्यात आला असून येणाऱ्या नवी पिढीला या पुतळ्याच्या माध्यमातून बोध घेता यावी व आपली संस्कृती, परम्परा, इतिहास जिवंत राहावे असे आवाहन अहेरीचे माजी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांनी केले. ते अहेरी तालुक्यातील राजाराम येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व सल्ला गांगरा वार्षिक सोहळा कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण सामाजिक कार्यकर्ते शंकर येरमा यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, सहउद्घाटक तिरुपती कूळमेथे, उपाध्यक्ष व्येंकटेश मडावी, प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच संजय पोरतेट, वसंत सड़मेक, सुरेश सोयाम, चंदुरशाही आलाम, मारोती पोरतेट, सुधाकर सोयाम वनरक्षक, आदि मंचावर होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुल पोरतेट (तलाठी) यांनी बोलताना वीर बाबुराव शेडमाके गडचिरोली क्षेत्राच्या इतिहासात आदिवासींच्या संघर्षाला अजरामर करून गौरवशाली प्रतिकार युद्धाची मांडणी करून गेले आहे व तो आजही वर्तमानातील शोषणा विरोधातील इथल्या संघर्षांना प्रेरणा देत आहे. त्यामुळे समाजाने त्यांचा आदर्श बाळगावा असेही त्यांनी आवाहन केले.
प्रमुख मार्गदर्शक महेश मडावी सर यांनी मार्गदर्शन करताना आदिवासी हाच देशाचा मूळ मालक आहे. तो वैचारिक आदर्शाचा मानबिंदू आहे. पारंपारिक संस्कृती समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी, आदिवासींचा प्रत्येक कायदा हिताचा ठरविण्यासाठी, आदिवासींचे न्याय हक्क व जबाबदाऱ्या कायम ठेवण्यासाठी आदिवासी समाजाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे सांगतानाच कायदेविषयक मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी गावाचा विकास करण्यासाठी ग्रामसभेने काय केले पाहिजे, वन अधिकार कायदा काय आहे, ग्रामसभेने कामकाज कसे हाताळावे, पंचायत राज म्हणजे काय ? एवढेच नव्हे तर जल, जंगल, जमिनीबाबत बोलताना त्यांनी ती आपली व्यक्तिगत प्रॉपर्टी नसून ती सामूहिक प्रॉपर्टी आहे. त्याचे जतन आपण कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिक्षक रमेश सोयाम व शिक्षक जी के मडावी यांनी थोर पुरुष,क्रांतिकारी योद्धांचे पुतळे उभारल्याने युवा पिढीला कशाप्रकारे प्रेरणा मिळते याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन माजी सरपंच विनायक आलाम यांनी केली. या कार्यक्रमाचा धार्मिक विधि व मूठपूजा बापू आत्राम सर व भूमीया संन्याशी सड़मेक यांनी केली.
यावेळी गोटुल समितीचे सदस्य आनंदराव वेलादी, यशवंत कन्नाके, मुनिशीराम आत्राम, लक्ष्मण सोयाम, देवाजी आत्राम, अनिता आलाम, मंगला आत्राम, भावना सड़मेक, मैनाबाई सोयाम, रमाताई वेलादी तर बिरसा सेनाचे सदाशिव वेलादी,विशाल सोयाम, परशुराम सड़मेक,वश्रीकांत मडावी,अमित सड़मेक,अक्षय पोरतेट,तर राणी दुर्गावती दलाचे आरती आत्राम,प्राची वेलादी, पायल कोडापे, संध्या कूळमेथ, मयुरी सोयामल व सदस्य सहकार्य केले. यावेळी गावातील महिला-पुरुष, युवक, युवती उपस्थित होते.

