महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेची निवेदना मार्फत मागणी.
अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन अकोला:- महात्मा फुले जिवनदायी योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करा अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी,मुख्यमंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री यांना आपले सरकार पोर्टल व ईमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली गोरगरीब रुग्णां साठी शस्त्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक व लाभदायक ठरणारी महात्मा फुले जिवनदायी योजना अकोल्यातिल कोणत्याच खासगी हॉस्पिटल मध्ये लागु नाही यामुळे गोरगरीब रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नागपुर, मुंबई सारख्या ठिकाणी जावे लागते नागपुर,मुंबई ला जाये पर्यंत रुग्णांचा मृत्यू होतो महात्मा फुले जिवनदायी योजना अकोल्यातिल सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल मध्ये लागु असली तर रुग्णांचे प्राण वाचु शकतो. अकोल्यात बरेचसे सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल असुन या हॉस्पिटल मध्ये रुग्णाची आर्थिक लुट सुरू आहे. सर्वोउपचार रुग्णालयातुन नागपुर ला रेफेर केलेल्या बऱ्याच रुग्णांचा मृत्यू झाला महात्मा फुले जिवनदायी योजना अकोल्यातिल हॉस्पिटल मध्ये सुरू असती तर या रुग्णांचे प्राण वाचले असते हे विशेष, महात्मा फुले जिवनदायी योजना सुरू नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांला मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे हे सर्व थांबायला हवे व जे सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जिवनदायी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करत नाही अश्या हॉस्पिटल वर कारवाई करण्यात यावी व जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन महात्मा फुले जिवनदायी योजना सुरू करण्या साठी अकोल्यातील हॉस्पिटलला आदेश द्यावेत अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आपले सरकार पोर्टल व ईमेल द्वारे जिल्हाधिकारी,मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.