सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील जिवती तालुक्यातील टेकामांडवा हद्दीतील गोलेवारगुडा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका 24 वर्षीय युवकाचा शेतातील कडूलिंबाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. संतोष राजेंद्र शिंदे 24 वर्ष, रा. गोलेवारगुडा असे मयत युवकाचे नाव आहे.
गुरुवारी गोलेवारगुडा येथे संतोष राजेंद्र शिंदे या युवकाचा संसायपद स्थितीत गळफास घेतलेल्या स्थितीत मृत्यदेह मिळून आला. संतोष राजेंद्र शिंदे या युवकाची हत्या की आत्महत्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र कुटुंबाने संतोषची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत शवविच्छेदना नंतर मृतदेह दोन तासांपासून चौकात ठेवत सखोल चौकशी करून आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
संतोष 28 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास बाहेर जाऊन येतो, असे आपल्या आईला सांगून मोटर सायकलने बाहेर पडला होता. उशिरापर्यंत आपला मुलगा घरी आला नाही म्हणून त्याच्या आई-वडिलांनी ठिकठिकाणी फोन करून विचारणा केली. 29 मार्चलाही तो कुठेच सापडला नाही. मात्र, 30 मार्च रोजी संतोषचा मृतदेह शेतातील झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला.
शवविच्छेदन करून आणलेला मृतदेह गाडीतच नातेवाईकांनी दोन तासांपासून चौकात ठेवला. ही हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात असून, जोपर्यंत आरोपीला ताब्यात घेण्यात येणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिस कार्यवाही सुरू होती. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार एस. पी. मडावी पुढील तपास करत आहेत.