प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सव सर्वकडे उत्साहात साजरा करण्यात आला. पण एक रुग्ण सेवेच्या पछाडलेल्या रुग्णसेवक गजू कुबडे यांनी रामनवमीच्या दिवशी दोन गरजू रुग्णांना रक्त देऊन राम जन्मउत्सव साजरा केला आणि रामजन्माचे सार्थक केले.
सेवाग्राम येथील रूग्णालयात भरती असलेल्या सौ. योगिताताई हिवरकर व हिंगणघाट येथील तुळसकर हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मुस्लिम समाजाच्या शबाना शेख यांना रक्ताची तातडीने गरज होती. त्यांना रक्ताची तातडीने मदत करून प्रभू रामचंद्राच्या पावन कार्याचे पालन करण्याचा गजू कुबडे यांनी प्रयत्न केला.
यावेळी महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना गजू कुबडे म्हणाले की, जेंव्हा देशात जात, धर्माच्या बंधनात रामाला बांधण्याचा प्रयत्न होत चाललेला आहे. अशावेळी शबाना शेखला आजच्या दिवशी रक्तदान करून खऱ्या रामाची पूजा मी बांधण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. कारण शबानाचा रहीम आणि माझा राम एकच आहे. दोघांचेही ध्येय आणि उद्देश केवळ मानवतेची सेवा हेच आहे. आणि तेच मी केले आहे आणि नेहमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
रुग्णसेवक गजू कुबडे यांच्या कार्याला हिंगणघाट शहरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. महाराष्ट्र संदेश न्युज पण गजू कुबडे यांच्या रुग्ण सेवेला सलाम करतो.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348