सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील मसाळा तुकुम परिसरात वाघाने एका म्हशीची शिकार करुन म्हशींचा फडश्या पडला आहे. त्यामुळे परिसरात वाघाची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे.
चंद्रपूर जिल्हात वाघाचे अस्तित्व अधूनमधून समोर येत असते. चंद्रपूर तालुक्यातील मसाळा परिसरात वाघाचा वावर असल्याचे कित्येकदा समोर आले आहे. अनेक भागात वाघ चित्ता दिस्ल्याच्या घटना ताज्या असतानाच मसाळा परिसरात वाघाने 4 वाजताच्या सुमारास चंद्रभान रामजी राहुलगडे यांच्या मालकीची म्हैसवर गावालगत हल्ला करून तिचा फडशा पाडला आहे.
चंद्रभान रामजी राहुलगडे यांनी या म्हशींना चरण्यासाठी गावालगत सोडले होते. त्या पुन्हा घराकडे न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता, ही घटना समोर आली. त्यामुळे परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.
मोबदला मिळावा गावकऱ्यांची मागणी.
चंद्रभान रामजी राहुलगडे म्हैस पालक यांची उपस्थिती अत्यंत बिकट असून वाघाच्या हल्यात ठार झालेल्या म्हशीचा या व्यक्तीला पूर्ण मोबदला मिळावा अशी मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.
नागरिकात दहशत…
वाघाचा बंदोबस्त करणे खूप गरजेचे असून, गेल्या महिन्यात आणि या महिन्यात गावालगतच जवळपास अश्या 4 ते 6 घटना घडल्या आहेत. तरी वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी विनंती वनविभागाला करतो.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348