मंगेश जगताप, मुंबई विक्रोळी प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुबई:- बोरीवली येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे मुलगी हट्ट करत म्हणून सावत्र नराधम बापाने मुलीची आई घरात नसताना 6 वर्षांच्या चिमुकलीला पट्ट्याने बेदम मारहाण करत सांडशीने खासगी भागावर जखमा करून अत्याचार केला. ही घटना समोर येताच सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.
नराधम बापाने मुलीवर अत्याचार केल्याचे ही मुलीच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हसत खेळत राहणारी मुलगी अचानक शांत झाल्याने शेजारी राहणाऱ्या महिलेला संशय आला. तिने मुलीला विश्वासात घेत चौकशी करताच तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार त्यांनी स्थानिक पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
पोलिसांनी वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. 6 वर्षीय मुलगी आई आणि सावत्र वडिलांसोबत राहत आहे. डिसेंबर 2022 ते 28 मार्चपर्यंत सावत्र वडिलांकडून तिला मारहाण होत होती. याबाबत कुणाकडे सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी मुलीला देण्यात आली होती.
शेजारी राहणाऱ्या महिलेच्या सतर्कतेमुळे घटना समोर आली. पोलिसांनी मुलीसह आईचे ट्रामा केअरमध्ये समुपदेशन केले. तेथे मुलीला विश्वासात घेत चौकशी करताच तिने वडिलांच्या विकृतीवद्दल वाचा फोडली. बोरिवली पोलीस आरोपी सावत्र पित्याचा शोध घेत आहेत.