विक्की डोके, भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन भंडारा:- महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषदद्वारे पोषण पंधरवड्या अंतर्गत विविध उपक्रम गेल्या वर्षी राबविण्यात आले होते. त्यादरम्यान पोषण ट्रेकर ॲप मध्ये केलेल्या उपक्रमांची नोंदणी घेणे बंधनकारक होते या पोषण ट्रॅक्टर मध्ये उल्लेखनीय काम केलेल्या जिल्ह्यांमधून भंडारा जिल्हा हा प्रथम आला आहे. भंडारा जिल्ह्यांनी 98% पोषण ट्रेकर मध्ये नोंदी करून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर पालघर व हिंगोली हे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर आहेत.
मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्ये जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनीषा कुरसुंगे, अर्चना किंमतकर व भारती राजूरकर या अंगणवाडी सेविकांचा सुद्धा सत्कार महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सचिव श्रीमती आय .ए. कुंदन आणि आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना रुबल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.
केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 98% लाभार्थ्यांची आधार सीडींगची माहिती पोषण ट्रेकर एप्लीकेशन मध्ये यशस्वी नोंदविल्याबद्दल व यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल भंडारा जिल्ह्याला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. यानिमित्त प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते श्रीमती कुरसुंगे व त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348