मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- तालुक्यातील बोरमाळा येथे एका चार वर्षीय मुलाला वाघाने ठार केले त्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दहशत मध्ये आहे. त्यामुळे गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील खासदार अशोकजी नेते यांनी सावली गावकऱ्यांसह, वाघाच्या दहशती संबंधी व गावातील विविध समस्याच्या विषयासंबंधी दिं.01 एप्रिल ला वनविभागाचे कर्मचारी, अधिकारीवर्ग, तहसिलदार, थाणेदार यांच्यासह चर्चा करून आढावा घेत बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार, निखिल सुरमवार, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्रतिभाताई बोबाटे, बोरमाळाचे सरपंच भोजराज धारणे, गेवराचे सरपंच मोहन चनावार, जगदिश हेटकर, पद्माकर इंगोले, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व गावातील नागरिक यांची उपस्थिती होती.