गोडाऊन बांधकाम संदर्भात आविस पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी घेतली भेट
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- राजाराम खांदला परिसरातील शेतकरी बांधवांना धान विक्री साठी राजाराम येथे गोडाऊन नसल्याने शेतकरी बांधवांना धान विक्रीसाठी कमलापूर येथे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करा लागत आहे. ही बाब लक्षात घेता राजाराम खांदला येथील शेतकरी बांधव, आविसचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन राजाराम येथे गोडाऊन बांधकाम करीता लोकवर्गणीतून शेतजमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्या करिता आविस पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची भेट घेऊन सदर विषयासंदर्भात चर्चा केले.
यावेळी शेतजमीन खरेदी करण्यासाठी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी आर्थिक मदत केले व गोडाऊन बांधकामाच्या मंजुरी साठी शासन स्तरावर प्रयन्त करण्याचे आश्वासन दिले यानंतर आविस पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, माजी सभापती भाष्कर तलांडे, राजाराम सरपंच नागेश कन्नाके, माजी उपसरपंच संजय पोरतेट, आविस सल्लागार तथा ग्राप सदस्य कंबगोनिवार काका, दिपक अर्का, तिरुपती कुडमेथे, विनायक आलाम, मुत्ताजी पोरतेट, राकेश तलांडे, सुखदेव आलाम, मुन्ना वेलादी, माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख, विनोद, कावेरी, संदीप बडगे, सुधाकर कोरेत या सह आविस पदाधिकारी उपस्थित होते.