Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आर्थिक सहकार्यामुळे राजाराम परिसरातील शेतकर्‍यांचा धान खरेदी/विक्री केंद्राचा जागेचा प्रश्न मार्गी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 3, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आर्थिक सहकार्यामुळे राजाराम परिसरातील शेतकर्‍यांचा धान खरेदी/विक्री केंद्राचा जागेचा प्रश्न मार्गी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अम्ब्रिशराव आत्राम यांनी जागा खरेदीसाठी १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली, शेतकऱ्यांनी मानले आभार.

मधूकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील राजाराम परिसरातील सुमारे १५ गावांना धान विक्रीसाठी दुरवरच्या कमलापुर येथील केंद्रावर जावे लागत असते त्यामुळे गरीब शेतकर्‍यांना खुप अडचणी येतात. खुप वर्षांपासुन राजाराम येथे धान खरेदी केंद्राची मागणी प्रलंबीत होती. बर्‍याच तांत्रीक बाबींच्या मुद्द्यावर मागणी पुर्ण होत नव्हती परंतु राजे अम्ब्रीशराव आत्राम पालकमंत्री असतांना जोर लावुन धान खरेदी केंद्राला मंजुरी मिळवुन दिली.

महसुल आणि वन विभागाकडे सोयीची जागा ऊपलब्ध नसल्याने पुन्हा जागेचा प्रश्न ऊभा ठाकला. गावकर्‍यांनी एकत्र येवुन पुढाकार घेतला व एक मोक्यावरची खाजगी जागा खरेदी करुन धान खरेदी केंद्रासाठी शासनाला ऊपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. परंतु समस्या सुटण्याचे नावच घेईना. जमिन मालकाला पैशाची तातडीची गरज भासली आणि गावकर्‍यांकडे पुरेशी रक्कम जमा झाली नव्हती त्यामुळे जमिनीचा व्यवहार फिसकटण्याची स्थिती निर्माण झाली.कमी वेळात मोठी रक्कम गोळा करणे परिसरातील शेतकर्‍यांसाठी अशक्यप्राय होते. शेवटी सरपंच आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीकांनी मदतीसाठी अम्ब्रीशराव आत्राम धाव घेतली. यावेळी त्यांनी समस्येचे गांभीर्य ओळखुन सढळ हस्ताने १ लाख रुपयांची आर्थीक हातभार दिला त्यामुळे धान खरेदी केंद्रासाठी जागेचा मोठा अडसर दुर झाला. राजाराम ग्रा.पं.क्षेत्रातील राजाराम, सुरायपल्ली, कोंकापार व खांदला ग्रा.पं. क्षेत्रातील खांदला, पत्तीगाव, कोत्तागुडम, चिरेपल्ली, मरनेली, रायगटा, गोल्लाकर्जी आणि तिमरम ग्राम पंचायत क्षेत्रातील तिमरम, गुड्डीगुडम, निम्मलगुडम इत्यादी गावांना ह्या धान खरेदी केंद्राचा लाभ होईल ह्या सर्व गावातील शेतकऱ्यांनी अम्ब्रीशराव आत्राम यांचे आभार मानले आहे.

यापुर्वीही पालकमंत्री असतांना राजे अम्ब्रीशराव आत्राम यापरिसरात रस्त्यांचे जाळे विणले, पुल बांधुन शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवला. आता धान खरेदी केंद्राच्या सर्व समस्या मार्गी लावून शेतकर्‍यांचे खरे कैवारी बनले.

यावेळी रविंद्र पंजलवार, मनोज सिडाम,वसंत सिडाम, संतोष तोर्रेम, धर्मा आत्राम,शंकर सिडाम, वसंत तोर्रेम, महेश सिडाम,महादेव आलाम,नागेश कन्नके सरपंच,भास्कर तलांडे माजी सभापती पं. स.अहेरी, विनायक आलाम माजी सरपंच, नारायण कंबागोनिवार ग्रा.प.सदस्य, मलय्या तोर्रेम, दीपक अर्का, मुत्ता पोरतेट, राकेश तलांडे, मोहन वेलादी, संजय पोरतेट, तिरुपती कुळमेथे, सुखदेव आत्राम, विलास करपेत यांच्यासह विविध गावातील शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव येथे आयुष्यमान भारत कार्ड योजना शिबीर थाटात संपन्न.

Next Post

3 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी, महाराष्ट्र संदेश न्युज तर्फे अभिवादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
3 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी, महाराष्ट्र संदेश न्युज तर्फे अभिवादन.

3 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी, महाराष्ट्र संदेश न्युज तर्फे अभिवादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In