विशेष लेख 3 एप्रिल 2023:- भारतात अनेक वीर पराक्रमी राजे झाले. त्यात स्वराज्याच्या साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरल आहे. ते कधी न मिटण्यासाठी. 2 एप्रिल आज छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे निर्वान 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर वयाच्या 50 व्या वर्षी झाले. त्यांच्या सह त्यांच्या चवथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई देखील सती गेल्या.
महाराष्ट्रातील एक कर्तुत्ववान उत्तम शासक, जनतेचे हित जोपासणारा राजा, हिंदवी स्वराज्याचे साम्राज्याचे संस्थापक एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी, आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्णाक्षरांनी आजतायगत कोरीव केले आहे आणि तसेच कायम राहील.
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र विदेशी आक्रमणकारी सत्तेचा काळ होता. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून हे सत्ताधारी त्यांना लुटत होते. अशा वेळी शहाजी राजे भोसले आणि राजमाता जिजाबाईंच्या पोटी लाखो कोरोडोचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.
लहान पणापासून राजमाता जिजाऊ नी शिवबाना शिक्षण, साहस, पराक्रम, युद्ध कौशल्य, जनतेचे हित आणि राज्याचे हीत हे गुण ठासून ठासून भरले राजमाता जिजाऊच्या प्रेरणेने शिवबा मोठे होत होते. सर्वत्र रयतेवर अन्यात होत असल्याचं चित्र दिसून येत होते. सत्ताधाऱ्यांच्या महालातून फतवे आले की रयत सहारून जायची.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापुरात आदिलशाही आणि मोगल साम्राज्याच्या विरोधात संघर्ष उभा करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. चौहुबाजूने बलाढ्य शत्रू त्यात अत्यंत कमी सैनिक, पण जीवाला जीव देणारे मावळे तयार करून गनिमीकावा युद्धनीतीचा वापर शत्रूला पराभूत करण्यासाठी केला.
शिवाजी महाराज यांनी तयार केलेल्या सैन्यात अनेक मुस्लिम, 12 बलुतेदार, सह सर्व जाती धर्माचे सरदार, सुबेदार आणि सैनिकांचा समावेश होता. त्यांनी स्वतःचे सैन्य तयार केले त्यांच्या सैन्यात 30 ते 40 हजार घोडेस्वार, 1260 हत्ती आणि तब्बल एक लाख पादचारी सैन्याचा समावेश होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज महाराष्ट्र ताट मानेने उभा आहे. तेव्हा पण निधळ्या छातीने दुश्मनाना भुईसपाट केलं आज पण करत आहे. “छत्रपती शिवाजी महाराज ये नाम ही काफी हैं दुश्मन की निव हलाने के लिये”. अस म्हटल जाते.
3 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा साम्राज्याचा सांभाळ केला.
रयतेचे स्वराज्य व्हावे
ही माता जिजाऊची इच्छा होती.
बांधून तोरण स्वराज्याचे
दुष्मानाच्या काळजात धडकी भरवणारी तलवार होती.
हजारो मेले तरी चालतील,
लाखोंचा पोशिंदा जगावा म्हणून रयतेची ढाल होती.
निधड्या छातीने रण मैदानी गरर्जनारी,
वीर शिवाजी बरोबर भवानी ती तलवार होती
ना कधी झुकला ना कधी तुटला,
असा एक “मर्द मराठा शिवबा”
संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा अभिमान होता…
महाराष्ट्र संदेश न्युज परिवारातर्फे तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुण्यस्थिती दिनी विनम्र अभिवादन.