उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रायगड:- दिनांक 02 रोजी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्यावतीने महाड तालुक्यातील ढालकाठी येथे महिलांची सभा घेऊन त्याना तथागत ग्रुपच्या कार्याविषयी माहिती दिली असता तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना कोकण विभाग अध्यक्ष मा.नवनाथ (भाऊ) लोकरे व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख महिला आघाडी सौ.योजनाताई लोखंडे तसेच प्रहार संघटनेच्या माणगाव तालुका अध्यक्ष रेश्माताई केरू मोरे तसेच मा.मनोहर चंद्रकांत लोखंडे तसेच प्रकाश सूर्यवंशी यांनी ढालकाठी येथे महिलांची उद्योग व रोजगार यासंदर्भात मीटिंग घेण्यात आली या मीटिंगमध्ये महिलांना तथागत ग्रुपच्यावतीने उद्योग व रोजगार उपलब्ध करून देणार व पुढील संघटनेची कार्य सर्वानुमते कसे पुढे नेता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख महिला आघाडी सौ.योजनाताई लोखंडे व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना कोकण विभाग अध्यक्ष मा.नवनाथ (भाऊ) लोकरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले…
यावेळी,शंकुतल पारठे, सुवर्णा सूर्यवंशी, वैशाली कदम, निकिता जाधव, प्रीती माने, रागिणी सकपाळ, श्रध्दा यादव, दीप्ती दळवी, रीना जाधव, सीमा यादव, शीतल जाधव, अंजेली सकपाळ, महिला पुरुष व गावातील समस्त मंडळी व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेतील पदाधिकारी सदस्य, महिला आघाडी उपस्थित होते..