पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
अलंकार पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- अभिषेक रोहिदास जाधव, वय २३ वर्षे, रा. गणेशनगर ओटा वसाहत, एरंडवणे, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर साथीदार २) तन्मय तानाजी इटकर, वय १९ वर्षे, रा. धारवडकर बिल्डींग, न हे रोड, पुणे ३) ईश्वर खंडूलाल चव्हाण, वय १८ वर्षे, रा. लक्ष्मीनगर वसाहत, डहाणूकर कॉलनी, कोथरूड पुणे ४) सुजल संजय कदम, वय १८ वर्षे, रा.हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती नवीन शिवणे, कर्वेनगर, कोथरूड पुणे ५) पियुष सतीश जाधव, वय- २० वर्षे, रा. कांबळे चाळ, आंबेडकर चौक, वारजे, पुणे तसेच इतर दोन विधीसंघर्षीत बालक या साथीदारासोबत संघटित टोळी तयार करुन नंदु अनंता जाधव, वय-२२ यास दि. २३/०२/२०२३ रोजी हॅप्पी कॉलनी लेन नं. १. कोथरूड, पुणे येथे अज्ञात कारणासाठी पाठलाग करून धारदार हत्याराने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यावर, चेह-यावर वार करून गंभीर जखमी केले होते. सदरबाबत त्यांचेवर अलंकार पोलीस स्टेशन गुरनं. २९/२०२३.भा.द.वि. कलम ३०७ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासा दरम्यान जखमी नंदु जाधव यांचेवर उपचार चालु असताना ते मयत झाल्याचे निष्पन्न झाल्याने अ.क्र.१ ते ५ यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असुन इतर दोन विधीसंघर्षीत बालक यांना बाल न्यायमंडळ यांचे समक्ष हजर केले असुन ते सध्या बाल सुधारगृहात आहेत. त्यावरुन दाखल गुन्ह्यात भादंविक ३०२, १२० (ब), आर्म अॅक्ट कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे कलम वाढ करण्यात आलेली आहे.सदर आरोपी अभिषेक रोहिदास जाधव, वय २३ वर्षे, रा. गणेशनगर ओटा बसाइत एरंडवणे, पुणे ( टोली प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करून अवैध मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी चोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवून, खुन खुनाचा प्रयत्न, अपहरण किंवा अपनयन केलेल्या व्यक्तीला लपवणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, गुन्हा करण्या करीता पूर्व नियोजित कट करणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राजेंद्र सहाणे यांनी मा.पोलीस उप-आयुक्त, परि०३, पुणे श्री सुहेल शर्मा यांचे मार्फतीने मा अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेंद्र डहाळे यांना सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी यांना अलंकार पोलीस स्टेशन गुरनं २९/२०२३. भा.द.वि. कलम ३०२,१२० ( ब ) आर्म अॅक्ट कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेंद्र डहाळे पुणे शहर यांनी मान्यता दिली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री. राजेंद्र गलांडे हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेंद्र डहाळे, पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त, परि-०३, पुणे, श्री. सुहेल शर्मा, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे श्री. राजेंद्र गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगिता पाटील तपास पथक तथा निगराणी पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, सपताळे व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही २० ची कारवाई आहे.