मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे सूप वाजले आहे. त्यात हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने ही निवडणुक घडणार असे अगोदर जाहीर करण्यात आले होते. त्यात पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे हिंगणघाट बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार असे चित्र निर्माण झाले आहे.
हिंगणघाट येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या एकूण 257 बाजार समितीचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे . त्यापैकी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती येथील पक्षाचे इच्छुक उमेदवार यांना दिनांक 27 मार्च 2023 ते 3 एप्रिल 2023 पर्यंत आपला उमेदवारी अर्ज भरण्याची संधी होती. त्यानुसार आज दिनांक 3 एप्रिल 2023 रोज सोमवारला कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलभाऊ देवतारे तथा जिल्हा संघटक भारत चौधरी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे व तालुकाप्रमुख सतीश धोबे शहरप्रमुख सतीश ढोमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट येथील बाजार समितीतील 18 जागापैकी सेवा सहकारी संस्था मतदार संघात एकूण 3 अर्ज दाखल करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे भारत कृष्णाची चौधरी, चंद्रशेखर नारायणराव तडस, अभिनंदन अजित कुमार मुणोत तसेच ग्रामपंचायत मतदार संघामध्ये राजेंद्र सदाशिव खूपसरे व हमाल- मापारी मतदारसंघात श्रीकांत श्रीराम मिसाळ असे एकूण 18 पैकी 5 जागांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. फॉर्म विड्राल होईपर्यंत महाविकास आघाडीतील घटक पक्षासोबत बोलणी करून येणारी निवडणूक यशस्वी लढवली जाईल.असे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांनी या ठिकाणी स्पष्ट केले.
इच्छुक उमेदवाराचा फॉर्म भरण्याकरिता पक्षाचे वतीने उपतालुका म्हणून प्रकाश अनासाणे, मनीष देवडे, शंकर मोहम्मारे, मनोज मिसाळ, गजानन काटोले, आशिष जयस्वाल, दिलीप घुसे, अमोल गायकवाड, गोपाल मेघरे, विनोद मोहोड, गोपाल गिरडे, चेतन शिंदे, समीर भाई , सुनील आष्टीकर, डॉ. जगताप, सुभान भाई, प्रज्वल नरड, विनय घुसे, दिलीप चौधरी, रुपेश काटकर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348