मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील 40 वर्षीय संदीप विनोद चापडे नामक इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याच्या मृतदेहा जवळ एक सुसाइड नोट सापडली त्या नोट मध्ये दोन पोलिसांची नावे लिहून असल्याचे समोर येतात संपूर्ण जिल्हात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय संदीप विनोद चापडे याने आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तडका फडक घटनास्थळी आली आणि पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आल्या. पोलिसांनी घटनस्थळी पाहणी केली असता तिथे एका चिठ्ठी सापडल्यानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले. चिठ्ठीत दोन पोलिसांचे नावे लिहिली असून त्यांच्याकडून मिळालेल्या धमकीमुळे हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. याप्रकरणी ठाणेदार महेश चव्हाण यांनी तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई विचारले असता त्यांनी सांगितले की, मृताच्या वडिलांची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.