महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन छत्रपती संभाजीनगर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेवर अत्याचार करण्यात आला त्यानंतर त्या महिलेची निर्दयी पने हत्या हत्या करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील चिखलठाणा विमानतळ परिसरात राहणारी पीडित महिला लघुशंकेसाठी गेली होती. दरम्यान लघुशंकेहुन परत येत असताना विमानतळाच्या भीतीलगत राहुल संजय जाधव वय 19 वर्षे रा. ऋषीकेश नगर, बकाल वस्ती, चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर, प्रिंतम उर्फ सोनु महेंद्र नरवडे वय 24, रवी रमेश गायकवाड वय 34 वर्षे यांनी पीडित महिलेला अडवलं. त्यानंतर त्यांना नग्न करून झाडाला बांधून अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे त्यानंतर महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान याबाबत महिलेच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, याबाबत पोलिसांना माहिती दिली.
विमानतळ परिसरात महिलेवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी, विविध तपास पथके तयार करुन आरोपींच्या शोध घेण्यासाठी रवाना केली. त्यानंतर राहुल संजय जाधव , प्रिंतम उर्फ सोनु महेंद्र नरवडे, रवी रमेश गायकवाड या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड विधान 302, 376 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348