ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
मो. 9860884602
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- येथील सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व प्रसिद्ध असलेले डॉक्टर स्वप्निल दादा पाटील व ताई सौ ग्रीष्मा पाटील यांनी पाचोरा शहरात भडगाव रोड हायवे येथे गेल्या चार वर्षांपूर्वी सिद्धीविनायक हॉस्पिटल टाकून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र दवाखाना चालू केला होता.
कोरोना काळात पेशंट यांना योग्य ट्रीटमेंट देऊन अनेक रूग्णांना त्यावेळी त्यांनी जीवदान दिले होते. मागील चार वर्षांत पाचोरा भडगाव परिसरातील हजारो रुग्णांना सिद्धीविनायक हॉस्पिटलचे संचालक श्री स्वप्निल दादा पाटील व ताई ग्रीष्मा पाटील यांनी अहोरात्र वैद्यकीय सेवा दिली. या ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलला अधिक अद्ययावत करण्याच्या दृष्टीने त्यांनी स्वतःची जागा घेऊन भव्य व दिव्य असे व सर्वांच्या सोयीनुसार पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या घरासमोर जागा घेऊन त्या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्याचा मानस केला व आज रोजी त्यांनी त्या जागेचे भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ केला. आज या हॉस्पिटल भूमिपूजन कार्यक्रमासाठी पाचोरा शहरातील डॉक्टर मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, पत्रकार मंडळी, विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348