अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर,4 एप्रिल:- सावनेर येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील समाजसेवी पत्रकारितेच्या आड वेश्याव्यवसाय चालविणारे राम गणेश गडकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रुषीया यांच्या मालकीच्या लॉज वर अवैध रित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याने पोलिसांनी धडक कारवाई केली.
सावनेर येथील समाजसेवी पत्रकारितेच्या आड वेश्याव्यवसाय चालविणारे राम गणेश गडकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रुषीया यांच्या न्यू रॉयल लॉज च्या नावाखाली चालत असलेल्या वेश्यावृत्ती व्यवसायावर अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने 31 मार्च 2023 रोजी दुपारी 1.15 च्या सुमारास धाड टाकली यावेळी न्यू रॉयल लॉज च्या खोलीत एका महिलेस युवका सोबत अर्धनग्न अवस्थेत आढळून आली होती. तिला विचारपूस केली असता तिने लॉज मालक व मॅनेजर पैशाचे आमिश दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले.
यावर मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे यांनी धाड टाकून अपराध क्र. 248/23 कलम 345 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 सहकलम 34 भारतीय दंड संहितेनुसार अटक करण्यात आली होती. ही कारवाई 31 मार्चला दुपारी 1.15 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत चालले. 1 एप्रिलला सावनेर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने अरुण रूषीया यास 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 3 एप्रिलला सावनेर पोलिसांनी अरुण रुशिया यास न्यायालयात हजर केले असता अरुण रूषीया च्या वकिलाने जमानितीसाठी अर्ज लावला मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज खारिज करीत न्यायालयीन कोठडी सुनावली.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348