हिंगणघाट पोलीस प्रशासन करीत आहे अवैध धंद्याकडे डोळेझाक, एमडी ड्रग्स,गर्दा, नायट्रो टयानच्या गोळ्या, चरस, गांजा, बनावट दारूची खुलेआम विक्री.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट, 04 एप्रिल:- हिंगणघाट शहरातील खुलेआम चालू असलेली ड्रग्स स्मगलिंग तसेच अवैध धंदे थांबविण्याबाबत शहरातील नागरिकांनी माजी नगरसेवक सौरभ तिमांडे यांची भेट घेतली असता हिंगणघाट पोलीस स्टेशन येथील ठाणेदार फुंडकर यांना माजी नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
वर्धा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून नरुल हसन आल्यापासून वर्धा जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसला असून चांगले कर्तबगार काम करत आहे.परंतु हिंगणघाट येथील हिंगणघाट पोलीस प्रशासनाच्या व राजकीय नेत्यांच्या साथीने अवैद्य व्यवसाय करणाऱ्या टोळ्या असून अवैध व्यवसाय खुलेआम शहरात सुरू आहे.
हिंगणघाट शहरातील संत कबीर वार्ड,इंदिरा गांधी वार्ड, गोमाजी वार्ड व शास्त्री वार्ड हे अवैध व्यवसायाचे मुख्य ठिकाण बनले आहे. खुलेआम विक्री होत असलेले पदार्थ म्हणजे एमडी ड्रग्स, गर्दा, नायट्रो टयानच्या गोळ्या, चरस, गांजा, बनावट दारू हे सर्व चारचाकी महागड्या गाड्या मधून खोट्या नंबर प्लेट तयार करून मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे त्यामुळे युवा पिढी व्यसनाधीन होऊन अनेकांचे घरी उध्वस्त होत आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर बनावट डुबलीकेट दारू तयार करून विकल्या जात आहे त्यामुळे अनेक लोकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून मृत्युमुखी पडत आहे.
शहरातील टोळ्यांच्या वतीने गुरे-ढोर चोरून अवैध गौ-तस्करी करत आहे व हायवे वरून मोठ्या प्रमाणात ट्रक पास करून देण्याचे काम सुरू आहे. हे सर्व प्रकार हिंगणघाट शहर पोलीस प्रशासनाच्या संगनमताने सुरू आहे असे सर्वत्र चित्र दिसून येत आहे. तसेच इंदिरा गांधी वार्ड, संत कबीर वार्ड या ठिकाणी मुलींची छेड सुद्धा होत असून शहरातील मागील काही काळात बलात्कार सारखे प्रकरण सुद्धा घडले आह. तसेच मैदानामध्ये खुलेआम रीत्या लाखो रुपयाचा जुवा दिवसा ढवळ्या सुरू असते या वार्डमध्ये नागरिक त्रस्त झाले आहे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन ३-४ पोलिसांची ड्युटी लावून पहारा ठेवण्याची विनंती केली आहे.
तरी हिंगणघाट पोलीस प्रशासनाने या सर्व गुन्हेगारांवर कारवाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348