प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या उपोषण मंडपाला भेट वरिष्ठांच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ खुशाल बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांचे आव्हान.
तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागातील परसोडा येथील प्रकल्प ग्रस शेतकर्यांच्या जमीनी दलाला मार्फत अवैधरित्या खरेदी करून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे दलालाच्या जाचाला कंटाळून अखेर प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
शेतकर्यांची शेतजमीन कवडीमोल भावाने खरेदी करनार्या दलालावर कार्यवाही करण्यात यावी व गुन्हे दाखल करून बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी उपोषणस्थळी खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांच्या पुढे आपबिती कथन केली व न्याय मिळवून देण्यासाठी मागणी केली.
यावेळी खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक यांनी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या व प्रकल्पग्रस्त शेतकर्यांवर होत असलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही व वरिष्ठांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले व आम्ही व भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. यावेळी प्रमुख उपस्थिती नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, राजुभाऊ घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष, सतीश उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, शिवाजी सेलोकर जेष्ठ नेते, किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, अरुण मडावी माजी सरपंच, किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, अमोल आसेकर माजी नगरसेवक, विजय रणदिवे माजी सरपंच, ओम पवार उपसरपंच, मनोज तुमराम उपसरपंच, कार्तिक गोंडलावार, रामलु भाजपा तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त शेतकरी, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348