युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नागपुर:- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उत्तर नागपूर शाखेचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपण्या आधी नविन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
नामांतर शहिद स्मारक इंदौरा उत्तर नागपूर येथे संपन्न झालेल्या या सभेचे अध्यक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे हे होते तर केन्द्रीय निरिक्षक म्हणून कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे व जिल्हा प्रधान सचिव कल्पना लोखंडे हिंगणा हे उपस्थित होते.
सभेची शुरुवात भारतीय संविधानाच्या सामुदायिक उद्धेशीका वाचनाने झाली. मावळत्या कार्यकारिणी चे कार्याध्यक्ष देवानंद बडगे यांनी आपल्या कारकीर्दीतील उपलब्धता व अनुभव यांची चर्चा केली. त्यानंतर मावळत्या अध्यक्षांनी जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली व नविन कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया आरंभ झाली. उपस्थित सर्व सभासदांनी सर्वानुमते व एकमताने अध्यक्ष म्हणून विभुतीचंद्र गजभिये, उपाध्यक्ष पदी प्रा.सुखदेव चिंचखेडे, कार्याध्यक्ष देवानंद बडगे, प्रधान सचिव चंद्रशेखर मेश्राम, विविध उपक्रम विभाग कार्यवाहक आनंद मामा मेश्राम, जात निर्मूलन व विवेकी जोडीदाराची निवड विभाग कार्यवाह – सुनिता सहारे व अल्का लाडे, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह- स्वेता गजभिये व माधुरी मेश्राम, वार्तापत्र प्रकाशन विभाग कार्यवाह – चरणदास गजभिये व कुंदन मेश्राम, मानसिक आरोग्य विभाग कार्यवाह -ज्योती जनबंधु व गंगा खांडेकर, सोसल मिडिया प्रमुख – वर्षा शहारे व राजकुमारी फोपरे, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभाग कार्यवाह -दिप्ती नाईक व रंजना ठवरे, युंवा सहभाग कार्यवाह -राॅकी घुटके व आशुतोष टेंभुर्ने विवेक निमगडे, सांस्कृतिक विभाग – अजय रहाटे विवेक निमगडे, महीला सहभाग विभाग कार्यवाह – चंदा मोटघरे व रेणुका दहीवले, प्रशिक्षण विभाग कार्यवाह- कल्याणी डोंगरे व आकाश नंदेश्वर, कायदेविषयक सल्लागार – ऍड डी जी रामटेके व प्रमुख सल्लागार म्हणून शांताराम मेश्राम व जे एस सोमकुंवर यांची नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी रामभाऊ डोंगरे यांनी नवनियुक्त सर्व पदाधिकार्यांना यथोचित संबोधित केले. या कार्यक्रमाला इंदु उमरे, तनुजा बौद्ध, प्रा.निता ईटनकर, विजया डोंगरे, वंदना लांजेवार, प्रा.पुष्पा घोडके व यशवंत घोडके, शिवकुमार फुले, प्रिया गजभिये, नरेश महाजन, अरविंद तायडे, उमेश रंगारी व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348