राजेंद्र झाडें, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपीपरी:- चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने, सांस्कृतिक व मस्त्यव्यवसाय मंत्री आदरणीय सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचा गोंडपिपरीत प्रथम आगमनाचा कार्यकर्त्यांकडून प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत, नृत्य सादर करून, तसेच राज्यगीतने करण्यात आले.
त्यांचा कार्याची पावती म्हणून कार्यक्रमाला उशिर झाला तरी कारकर्यांची प्रचंड प्रतिसाद मिळाला, भरभरून भाऊंच सत्कार करण्यात आला आणि भेटवस्तू देऊन भाऊंसाठी असलेल प्रेम ,आदर व्यक्त करण्यात आले.मंचावरून बोलत असतांना म्हणाले कोंडय्या महाराज संस्थान धाबा च्या वतीने महाराजांची मूर्ती भेट स्वरूपात देऊन गौरविण्यात आल्याने महाराजांचा आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील.आणि गोंडपिपरी तालुक्याचा विकासासाठी सदैव प्रयत्नात असणार, गोंडपिपरीतील स्वागत सोहळा सदैव स्मरणात राहील, अश्या शब्दात नागरीकांना संबोधित केले.
यावेळी मंचावर माजी आमदार मा. संजय धोटे,मा. सुदर्शन निमकर, जिल्हाध्यक्ष मा.देवराव भोंगळे,माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार , तालुकाध्यक्ष बबन निकोडे,नामदेव डाहूले,अल्का आत्राम,चेतन गौर, गट विकास अधिकारी माऊलीकर,तहसीलदारमॅडमे , आदि उपस्थित होते.