लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात लाखो रुपये मिळाल्याने एकच खळबळ.
✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला यांना 1 लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
शासकीय वृक्ष लागवडीचे 50 लाख रुपयांचे देयके मंजूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नारायणदास बुब वय 57 वर्ष यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी एक लाख रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई 6 रोजी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पिपरी (मेघे) येथील रहिवासी तक्रारदार यांच्या संस्थेचे शासकीय करारानुसार वृक्ष लागवडीचे पूर्वी तीन टप्प्यांचे देयके मिळाले होते.
चौथ्या टप्प्यांतील 50 लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता प्रकाश बुब हे तक्रारदाराला त्रास देत होते. तसेच मंजूर देयकावर पाच टक्क्यांची मागणी करु लागले. तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्यास असर्मथता दाखविली असता देयकं काढून देण्यासाठी कार्यकारी अभियंता बुब टाळाटाळ करीत होते. अखेर प्रकाश बुब याने 1 लाख रुपयांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे 6 रोजी तक्रारदार कार्यकारी अभियंता प्रकाश बुब याच्या निवासस्थानी एक लाख रुपये घेऊन गेला. प्रकश बुब याने लाच स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी छापा मारुन लाच स्विकारताना रंगेहात पकडले. आरोपी प्रकाश बुब याला लाचलुचपत विभागाने अटक करुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक डी.सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनात संतोष बावणकुळे, प्रशांत वैद्य, प्रदीप कुचनकर, प्रितम इंगळे, प्रशांत मानमोडे यांनी केली.
लाचखोर अधिकाऱ्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात मोठे घबाड सापडले आहे. त्यामुळे हा कार्यकारी अभियंता प्रकाश बुब याने अनेक प्रकारचे भष्ट्राचार आणि लाचखोरी करून मोठी मोहमाया जमा केली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.