पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
युनिट ०१ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक २४/११/२०२२ रोजी फिर्यादी त्यांचे वस्तीत रहाणारा उमेश वाघमारे यास गल्लीतून जोरात गाडी चालवू नको असे सांगीतले असता त्याने मी यावस्तीचा भाई आहे तुला माहित नाही का ? तुला बघून घेतो अशी धमकी दिली. त्याकारणावरून फिर्यादी यांचे तोंड ओळखीचा इसम याने फिर्यादी यांचा रस्ता आडवून आमचा भाई जंगळ्या सातपुते जेलमधून सुटला आहे. त्याने तुझ्याकडून ४०,०००/- रू घेवून ये असे सांगीतले असता त्यावर फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता तुला अर्ध्या तासात दाखवितो असे म्हणुन उमेश वाघमारे, आदीत्य बनसोडे, मंदार खंडागळे, कुमार लोंढे व त्याचे साथीदारांनी टोळी प्रमुख विशाल उर्फ जंगळ्या सातपुते याचे सांगणे वरून कोयते, लोखंडी रॉड व लाकडी बांबूने फिर्यादी यांना मारहाण करून त्यांचा खुन करण्याचा प्रयत्न केला होता.
सदरबाबत खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ३४१ / २०२२ भादवि कलम ३०७, ३८७, ३४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०६, आर्म अॅक्ट कलम ४/२५, महा पो कायदा कलम ३७/१ सह १३५ असा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान आरोपी हे संघटीत गुन्हेगार टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्ह्यात क्रिमीनल ला अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ महा संघटीत गुन्हेगारी अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ ( २ ) ३ ( ४ ) अन्वये कलम वाढ करण्यात आले होते. दाखल गुन्ह्यातील वरील सर्व आरोपींना यापुर्वीच अटक करण्यात आली होती तेव्हा पासून यातील टोळी प्रमुख विशाल उर्फ जंगळ्या सातपुते हा फरार होता.
यातील पाहीजे आरोपीचा शोध चालु असताना दिनांक ०५/०४/२०२३ रोजी आरोपी नामे विशाल उर्फ जंगळ्या सातपुत उरुळीकांचन परिसरात लपुन बसल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल पवार यांना मिळाली त्यांनी सदरची बातमी युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शब्बीर सय्यद यांना कळविली असता त्यांनी तात्काळ पोलीस अधिकारी व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना मार्गदर्शन व सुचना देवुन रवाना केले त्याप्रमाणे दिनांक ०५/०४/२०२३ रोजी पासून सोरतापवाडी, कोरेगावमुळ उरुळीकांचन याभागात ठिकठिकाणी शोध घेत असता आरोपी नामे विशाल उर्फ जंगळ्या शाम सातपुते, वय ३२ वर्ष सध्या रा. उरुळीकांचन गगन आकांशा सोसायटी, पुणे मुळ रा. पीएमसी कॉलनी नं. ९, घोरपडे पेठ, पुणे यास गगन आकांशा सोसायटी, ऊरुळी कांचन, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे- १. पुणे श्री. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, शब्बीर सय्यद, पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार, अमोल पवार, इम्रान शेख, आण्णा माने, निलेश साबळे, शुभम देसाई, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे,आय्याज दड्डीकर , तुषार माळवदकर यांनी केली आहे.