पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
गुन्हे शाखा युनिट ३ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :-दि.०६/०४/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार है हनुमान जयंती उत्सव अनुषंगाने कोथरूड पोलीस ठाणे हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ३. पुणे शहर यांना बातमी प्राप्त झाली की, दि. ०६.०४.२०१३ रोजी चालु असलेल्या इंडीयन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) कलकत्ता नाईट रायडर्स (केकेआर) विरुध्द रॉयल चॅलेज बंगलोर (आरसीबी) या क्रिकेट मॅचवर इसम नामे आकाश धरमपाल गोयल वय ३० वर्षे रा. स. नं. ९३. निबाळकर नगर, एरोपॉलीस सोसा. जवळ, लोहगाव, पुणे हा क्रिकेट बेटिंग गुजन टॉकिजजवळ, येरवडा, पुणे येथे घेत असलेबाबत माहिती मिळाली.
नमुद आरोपीचा गुंजन टॉकिज परीसरात शोध घेता तो येरवडा स्मशानभूमी शेजारी असलेल्या मोला पान शॉपजवळ, येरवडा, पुणे येथे मिळून आला. त्यास ताब्यात घेवून मिळाले बातमीचे अनुषंगाने त्याचेकडे तपास करता व त्याचे ताब्यात मिळाले मोबाईलची पाहणी करता तो दि. ३१/०३/२०२३ रोजीपासुन इंडीयन प्रिमीयर लीगच्या झालेल्या क्रिकेट मॅचचे कालावधीत सटटा घेतल्याचे आढळले. तसेच आकाश धरमपाल गोयल वय ३० वर्षे रा. स. नं. ९३. निंबाळकर नगर, एरोपॉलीस सोसा. जवळ, लोहगाव, पुणे व त्याचेकडे खेळणारे ४ इसमाविरुद्ध येरवडा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम १२ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याचेकडून सटटा घेण्याकरीता वापरत असलेला मोबाईल हॅन्डसेट जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही. मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे. पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री. सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, शरद बाकसे, सुजीत पवार, संजिव कळंबे, सतिश कत्राळे, राकेश टेकावडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे.
दाखल गुन्हयाचा पुढिल तपास संतोष क्षीरसागर, सहायक पोलीस उप-निरीक्षक. गुन्हे शाखा युनिट ३. पुणे शहर हे करीत आहेत.