पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या दुचाकी चोरींच्या घटनांवर अंकुश ठेवण्याकरीता दुचाकी करणारे आरोपींचा शोध घेऊन वाहन चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत विशेष मोहीम आखून त्याप्रमाणे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मा. श्री सत्यवान माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी त्याचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व तपास पथकातील अंमलदार यांना वाहन चोरों गुन्हे करणारे आरोपीचा शोध घेऊन त्याचेवर कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाची वेगवेगळी पथके तयार करून दुचाकी चोरी करणारे गुन्हेगारांची माहीती काढण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे सपोनि संतोष पाटील यांना विश्वास बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, तापकीर मळा चौक येथे एक मोटार सायकल चोर हा चोरीची मोटार सायकल विक्री करीता येणार आहे त्या बातमीप्रमाणे सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व त्यांचे पथक यांनी सापळा रचून संशयीत इसम नाम नितीन राजेंद्र शिंदे, वय २० वर्ष, रा. शेकापुर शिंदेवरती, ता. आष्टी, जि. बिड वास त्याचे ताब्यातील होडा शाईन मो.सा. नं. एमएच २४ एएच १५२० सह शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचेकडे तपास करता त्याचेकडे मिळालेली मोटार सायकल ही त्याने रहाटणी भागातून चोरी केली असल्याचे व त्याबाबत वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २३२ / २०२३ भादंवि कलम २७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामुळे त्यास अटक करून त्याचेकडे अधिक तपास करून त्याचे साथीदार मुख्य सुत्रधार आरोपी केशव महादेव पडोळे वय २५ रा. दादा बोडके यांचे खोलीत भाडयाने बोडकेवाडी, माण ता. मुळशी जि. पुणे मूळ रा. केळसांगवी ता. आष्टी जि. बिड याचेसह त्यांचे इतर साथीदार नामे १) नवनाथ सुरेश मुटकुळे वय २४ वर्षे रा. बालाजी कॉलनी, सगर यांचे खोलीत भाडयाने थेरगाव पुणे गुळ रा.करंजी ता. पाथर्डी जि. अहमदनगर, २) ऋषीकेश अजिनाथ भोपळे वय २३ वर्ष रा. पारगाव जोगेश्वरी ता. आष्टी जि.बिड, ३) अमोल दगड पडोळे वय २४ वर्षे रा. केळसांगवी ता. आष्टी जि. बिड यांना वेगवेगळ्या ठिकाणावरुन पकडुन त्यांना अटक करण्यात आले आहे.त्यांचेकडे कौशल्यपूर्वक तपास करून त्यांचेकडुन वाकड पो.स्टे. हड्डीतील एकूण १४, हिंजवडी पो.स्टे. हद्दीतील ०४,बारामती तालुका पो.स्टे. हद्दीतील ०७, राजणगाव पो.स्टे. हद्दीतील ०३ गुन्हे, अहमदनगर कॅम्प पो.स्टे. हडीतील ०२, बारामती
शहर, चाळूज एमआयडीसी, पाथडी, कोतवाली, कर्जत, श्रीगोंदा पो स्टे कडील प्रत्येकी ०१ असे एकूण ३६ गुन्हे केल्याचे उघडकीस आणले असून सदर गुन्हयातील ३६ मोटर सायकल व इतर ०७ चोरीच्या मोटार सायकल अशा एकूण ४३ चोरीच्या मोटर सायकल मिळुन किं. रु. २१.५० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांचेकडून हस्तगत करण्यात आलेला आहेत.
उघड ३६ गुन्हयांव्यतिरिक्त त्यांचेकडुन हस्तगत केलेल्या इतर ०७ मोटर सायकल पुढील प्रमाणे असून त्याबाबत माहीती काढून अधिक तपास चालू आहे.
१) बजाज प्लॅटीना MH 12 GY 5650, २) मेस्ट्रो MH 14 GP 4416, ३) बजाज पल्सर MH 14 AA 9679, ४) हिरो | स्प्लेण्डर MH 31 BD 3608, ५) होंडा यूनिकॉर्न MH 14 HF 6391 ६) होंडा शाईन MH 12 MK 5481, ७) होंडा अॅक्टिवा MH 23 AZ 3373
गुन्हयाचे तपासामध्ये असे दिसून आले आहे की, आरोपी मोटर सायकल चोरुन त्या परजिल्हयात विकत होते व काही नागरीक मोटर सायकलचे कागदपत्रांची पडताळणी तसेच सत्यता न तपासता स्वस्तामध्ये मिळतात म्हणून चोरीच्या मोटर सायकल विकत घेत आहेत. चोरीच्या मोटार सायकल आहेत हे माहित असतानाही ते विकत घेतल्यामुळे गुन्ह्यात भादंवि कलम ४११ चा अंतर्भाव करुन एकुण १७ इसमावर कारवाई करण्यात येत आहे.त्यामुळे नागरिकाना आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी दक्ष व जागरुक राहून मोटर सायकलचे कागदपत्राची पडताळणी तसेच सत्यता न तपासता कोणतेही वाहन विकत घेवु नये तसेच कोणी अशा प्रकारे कागदपत्रे नसताना मोटर सायकल विकत असल्याबाबतचा प्रकार निदर्शनात आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त, परि- २. पिंपरी चिंचवड, मा. श्री. श्रीकांत डिसले, सहा.पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे-१, मा. श्री. रामचंद्र घाडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे-२, सपोनि संतोष पाटील, सर्वानि, संभाजी जाधव, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफो विभीषण कन्हेरकर, सपोफो बाबाजान इनामदार, सपोफ, राजेंद्र काळे, पोहवा, संतोष वर्ग पोहवा बंदु गिरे पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा स्वप्निल खेतले पोहचा. अतिश जाधव, पोहचा. प्रमोद कदम, पोना, प्रशांत गिलबीले, पोना अतिक शेख, पोना विक्रांत चव्हाण, पोना, राम तळपे, पोशि अजय फल्ले, पोशि तात्या शिंदे, पोशि कोतेय खराडे, पोशि भास्कर भारती, पोशि स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि विनायक घारगे, पोशि. रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे…