तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारतीय जनता पार्टी राजुरा विधानसभा क्षेत्राचे वतीने प्रखर राष्ट्र भक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समर्थनार्थ गौरव यात्रा दि. ७-०४-२०२३ रोजी सायंकाळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान चौक पंचायत समिती येथून काढण्यात आली. सावरकरांची व्यक्तिरेखा श्रीराज देशपांडे यांनी साकारली.
रॅलीचा समारोप गांधी चौकात करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष भारत सरकार हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. प्रास्ताविक जेष्ठ पदाधिकारी अरुण मस्कि यांनी केले. सभेला हंसराज अहीर, माजी आमदार अँड संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांची समयोचित भाषणे झाली. भाषणातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यावर व जीवनपटावर इत्यंभूत माहिती दिली.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वि दा. सावरकर यांच्या बद्दल उद्गगारलेल्या अपशब्दा बदल निषेध करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमान केल्याबद्दल त्यानी देशाची माफी मागितली पाहिजे. राष्ट्रपुरुषांच्या अवमान भाजप चे कार्यकर्ते व देशाचे नागरिक सहन करणार नाही असे ठणकावून सांगितले.
यावेळी वि.दा.सावरकर गौरव यात्रेकरिता राजुरा विधानसभा क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी राष्टप्रेमी युवक देशप्रेम नागरिक तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच तालुका अध्यक्ष महामंत्री नगर सेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगर पंचायत सदस्य आदीसह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमचे संचालन प्रशांत घरोटे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम या गीताने झाली.