अतुल वांदीलेंना नागपूर येथे बोलावून घेत झाली संघटनात्मक चर्चा.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्याशी सखोल चर्चा केली. नागपूर येथील रेडीसन ब्ल्यू हॉटेल येथे शरद पवार आले असता ही संघटनात्मक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान जिल्ह्यात पक्ष बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रातील ताकतवर व्यक्तींचां पक्षात प्रवेश केला जाणार आहे.
राज्याचे सरकार हे अस्थिर असून केव्हाही निवडणुकांना पुढे जावे लागू शकते, यासाठी म्हणून पक्षाची तयारी ही त्या दृष्टिकोनातून करण्याबाबत देखील सविस्तर चर्चा झाली. अतुल वांदिले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होऊन एक वर्ष झाले .या वर्षभरामध्ये सात हजारांच्या वर कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणण्याचे अतुल वंदिले यांनी केलेल्या कामाचे शरद पवार यांनी कौतुक केले. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखिल उपस्थीत होते. तर या भेटी दरम्यान माजी केंद्रीय मंत्री व वर्धा जिल्हा संपर्क अध्यक्ष सुबोध मोहिते यांनी वर्धा जिल्हात पक्ष बळकट करण्यादरम्यान आलेल्या अनेक आव्हानांन बद्दल देखिल शरद पवारांना अवगत करून दीले.
यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, पवन तिजारे, दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, रोशन तेलंगे, प्रशांत लोणकर आदी उपस्थित होते.