पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
वारजे माळवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ०७/०४/२०२३ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर कडील तपास पथकातील अंमलदार पोलीस नाईक अमोल राऊत यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की “सागर नावाचा इसम हा एन.डी.ए. ग्राऊंडवर असून त्याचेकडे पिस्टल आहे” अशी माहिती मिळाल्याने लागलीच तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक रामेश्वर पायें, पोलीस अमलदार अमोल राऊत, विजय भुरुक यांनी सदर ठिकाणी जावून खात्री केली असता तेथे एक इसम संशयितरित्या फिरताना दिसून आल्याने त्यास तपास पथकाने शिताफीने ताब्यात घेवुन त्याची अंग झडती घेतली असता त्याचे कमरेला ३५,१००/- रू किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल त्यामध्ये एक जिवंत काडतूस असे विनापरवाना स्वतःजवळ बाळगलेले असताना मिळून आला. त्यास नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव सागर गणेश सुतार वय २५ वर्षे रा. फ्लॅट नंबर ई १०१, इको सिटी सोसायटी, वरळेगाव, तळेगाव, ता. मावळ, जि. पुणे असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यास पोलीस ठाणे येथे आणून अधिक तपास करता तो सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील दाखल गुन्हयातील फरार आरोपी असून त्याचे विरुध्द विविध पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन तो एक सराईत गुन्हेगार आहे. त्याचे विरुध्द वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १३९ / २०२३ भारतीय हत्यार प्रतिबंध कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ३७ (१) ( ३ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पायें हे करत आहेत.
सदरची कामगीरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-३, पुणे शहर श्री सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर, श्री. सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर श्री दगडू हाके व पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे यांच्या आदेशान्वये सपोनि बाबर व तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक श्री. रामेश्वर पायें, पोलीस अमलदार प्रदिप शेलार, अमोल राऊत, विजय मुरुक्क बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, अजय कामठे यांनी केलेली आहे.