तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- प्रखर राष्ट्रभक्ती, अफाट कर्तृत्व व द्रष्टे युगपुरुष असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील शौर्याचा इतिहास हा धगधगते अग्नीकुंड असतांना भारतमातेच्या अशा महान राष्ट्रपुरुषावर त्यांच्या देशसेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न किडलेल्या मानसिकतेतून होणे हा संपूर्ण राष्ट्राचा अपमान असून अशा प्रवृत्तीला सर्वत्र विरोध झाला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही सावरकरांनी देशासाठी केलेल्या कार्याची महती सांगणारा सोहळा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
वरोरा येथे दि 08 एप्रिल रोजी आयोजित सावरकर गौरवयात्रा प्रसंगी उपस्थित जनसमुदायास संबोधित करतांना हंसराज अहीर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या प्रवृत्तींचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला. राहुल गांधी यांनी तेजोमय सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आपलेच तोंड भाजून घेतले. स्वातंत्र्यवीरांना अवघ्या 28 व्या वर्षी काळ्या पाण्याच्या शिक्षेला देशाच्या स्वातंत्र्यासाठी सामोरे जावे लागले. 14 वर्षांचा अंगावर काटे उभे राहणारा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांच्या प्रेरणेतून अनेक सशस्त्र क्रांतिवीरांचा उदय झाला. देशाच्या राजकारणात शेकडो राजकारणांचे स्वा. सावरकर प्रेरणास्त्रोत असतांना अशा महान विभूतींचा उपमर्द करण्याची दुर्बुध्दी का सुचते ? असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. सावरकरांवरील अपमानजनक टीकेची किंमत संबंधितांना चुकवावी लागेल असेही यावेळी हंसराज अहीर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, देश शस्त्रसज्जतेमध्ये स्वयंपूर्ण असावा ही स्वातंत्र्यवीरांची विचारधारा होती. देशाची सनातन संस्कृती अबाधित रहावी व हा देश सकल हिंदुराष्ट्र म्हणून उदयास यावा असे त्यांचे स्वप्न होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशाला शस्त्रसज्जता प्राप्त करुन दिली. स्वदेशी शस्त्रसज्ज निपुणता निर्माण केली. जगात भारताचा दबदबा व आब राखला ही सारी उपलब्धी सावरकरांच्या साहित्य विचारांची देणगी असल्याचेही हंसराज अहीर यांनी उपस्थित सावरकर प्रेमिंना सांगीतले. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लाखो नरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे त्यामुळे स्वातंत्र्यसमरातील योध्यांचा अशाप्रकारे उपमर्द करणे यासारखी अन्य दुर्देवी बाब असूच शकत नाही असेही अहीर म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे कातिकारकांचे मुकुटमणी होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर आकाशवाणीवर स्वातंत्र्यवीरांना द्रष्टा क्रांतीकारी नेता म्हटले होते ज्यांनी भारतीय तरुणांना आजाद हिंद सेनेत भरती होण्यास प्रेरीत केले.
हंसराज अहीर यांनी राजुरा व वणी या शहरात सावरकर गौरवयात्रेस संबोधित केले. या गौरवयात्रेमध्ये आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर, नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी, दिनकर पावडे, तारेंद्र बोर्डे, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, बाबा भागडे, ओम मांडवकर, करण देवतळे, गजानन विधाते, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, रवी बेलुरकर, श्रीकांत पोटदुखे, किरण बुजोणे, सुनिल मोहितकर, अरुण म्हस्की, सुनिल उरकुडे, राजू घरोटे, सतिश धोटे, राजेंद्र डोहे, प्रशांत घरोटे, केशव गिरमाजी, सुरेश केंद्रे, महेश देवकते, वाघुजी गेडाम, किशोर बावणे, सतिश उपलेंचवार, निलेश ताजणे, रामेश्वर मोरे, पांडे महाराज, नरेंद्र जीवतोडे, प्रवीण सुर, सुरेश महाजन, राजू गायकवाड, योगीताताई लांडगे, सायरा शेख, सुवर्णलेखा पाटील, यांचेसह भाजप, शिवसेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी व सावरकर प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.