ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
मो. 9860884602
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पाचोरा:- डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पाचोरा शहरात शांतता, सुव्यवस्था राहिली पाहिजे म्हणून शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
पाचोरा शहरात 14 एप्रिल रोजी भव्य दिव्य व हजारोचे संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येते ही मिरवणूक जनता वसाहत भारतीया नगर येथून निघत असून या तिन्ही मिरवणुका उत्साहाने व आनंदाने निघत असून या मिरवणुका मध्ये सर्व धर्मीय सर्व जातीय सलोखाचे कार्यकर्ते असतात ही मिरवणूक शिवाजीनगर जामनेर रोड प्रकाश टॉकीज चौक आठवडे बाजार गांधी चौक या रूट मार्गावर निघत असून यामध्ये अनेक बालगोपाळ मंडळी महिला वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारसरणीचे सर्व कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटना पत्रकार मंडळी राजकीय पुढारी सर्वच उपस्थित असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उत्साह निमित्त व्याख्यानमाला व जय भीम या गीतावर आधारित गाण्याचा कार्यक्रम घेतला जातो या निवडणुकीच्या निमित्त शांतता निर्माण राहावी याकरिता पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे सर्व मंडळांना बोलून त्यांचे आयोजक व अध्यक्ष कार्यकर्त्यांची बैठक पोलीस स्टेशनला घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते यावेळी अध्यक्ष स्थानी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले MSCB चे श्री बबलू आदिवाल, प्रवीण ब्राह्मणे, किशोर डोंगरे, अशोक मोरे, अविनाश सावळे, एडवोकेट रोहित ब्राह्मणे इत्यादींनी काही सूचना मांडल्या.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सर्वांना योग्य सूचना व मार्गदर्शन केले तसेच पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी कार्यकर्त्यांना शांतता मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी सूचना केल्या यावेळी सर्व मंडळाचे सदस्य व पत्रकार उपस्थित होते.