ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
मो. 9860884602
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- येथे दिवसरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांमुळे सामान्य नागरिक सुरक्षित असतात. हे पोलीस प्रत्येक सणासुदीला आपले कुटुंब सांभाळून देशासाठी खाकी वर्दी परिधान करून नागरिकांचे रक्षण करणार्या पोलिसाचा सत्कार म्हणजे कर्तृत्ववान सन्मान असल्याचे पाचोरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा साईमत समाचार वृत्तपत्राचे संपादक गणेश शिंदे यांनी सांगितले.
पाचोरा शहरात बाहेरपुरा भागांत पंचमुखी हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने हनुमान जयंती शांतमय वातावरणात मोठया उत्साहाने मिरवणूक साजरी करण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन महावितरण विभागाने खूप मोलाचे सहकार्य केले होते. त्याच्या मुळे तरुणांमध्ये अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हनुमान जयंती आणि मुस्लिम समाजाची रमजान ईद निमित्त रोजा सुरू असल्याने या उत्सवामध्ये कोणत्याही स्वरूपाचा गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरांमध्ये मिरवणुकीच्या मार्गावर अतिशय पोलीस कर्मचारी व होमगार्ड पथकाचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्त मुळे बाहेरपुरा पंचमुखी हनुमान चौक मित्र मंडळ तर्फे हनुमान जयंतीची मिरवणुकीची चर्चा संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध झाली या निमित्ताने पंचमुखी हनुमान जयंती उत्सव समितीतर्फे पोलीस अधिकारी सह पोलिसांचा व होमगार्ड पथक नगरपालिका महावितरण या विभागातील ज्या ज्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मेहनतीने मोलाचे सहकार्य केले, त्यांचा सत्कार आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन ८ एप्रिल २०२३ शनिवार रोजी सायंकाळी ७ वाजता पंचमुखी हनुमान चौक येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाचोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री राहुल मोरे पोलीस उपनिरीक्षक श्री रामदास दादा चौधरी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महावितरण विभागाचे शिवदास पाटील होते. या कार्यक्रमात प्रमुख्य मार्गदर्शक पाचोरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा साईमत समाचार वृत्तपत्राचे संपादक श्री गणेश शिंदे यांनी केले पंचमुखी हनुमान जयंती उत्सव समितीतर्फे पोलिसांचा व होमगार्ड महावितरण व नगरपालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, हा सत्कार स्वीकारण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक श्री राहुल मोरे पोलीस उपनिरीक्षक रामदास चौधरी, सचिन पवार, ट्राफिक हवालदार बापू महाजन, सुनील पाटील, होमगार्ड पथकाचे प्रमुख चंद्रकांत महाजन, रवी पाटील, लक्ष्मण पाटील, नाना राजपूत, कपिल पाटील, नगरपालिका प्रशासना तर्फे राकेश फतरोड, नितीन सासर, गोविंद सूर्यवंशी, रणजीत चनाडे, महावितरणा तर्फे शिवदास पाटील, अमोल पाटील, सुशील पाटील, यांचा महाराष्ट्राच्या संस्कृती प्रमाणे टोपी व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.
यावेळी मुस्लिम समाजाचे सईद पंजाबी रसूल शेख हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संदीप चौधरी उपाध्यक्ष सचिन चौधरी मिरवणुकीचे अध्यक्ष किशोर भोई, उपनगराध्यक्ष बंडू चौधरी माजी नगरसेवक दादाभाऊ चौधरी जगदीश पाटील शरद पाटील सुमित सावंत श्री अनिल सावंत, डॉ भरत पाटील, जितेंद्र जैन नगरसेवक प्रकाश चौधरी, अनिल चौधरी, बबलू सावळे, छोटू चौधरी, किशोर सोनार, ऍड आजिंक्य ठाकुर, तात्या चौधरी, गणेश चौधरी, संदीप पाटील, पप्पू पाटील, आकाश चौधरी, सतीश चौधरी, भावेश चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, राकेश सूर्यवंशी, संजय चौधरी, राहुल महाजन, पप्पू महाजन, विकी चौधरी, वनराज चौधरी, जय चौधरी, जितू महाजन, मनोज चौधरी, वीरेंद्र चौधरी, सागर चौधरी, वैभव चौधरी, विशाल चौधरी, जयदीप चौधरी, सोनू सोनवणे, उमेश निकम, विनोद चौधरी, राजू चौधरी, पंडित चौधरी, यांच्यासह बाहेरपुरा भागातील विविध मंडळाची पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले तर श्रीकांत गायकवाड यांनी आभार मानले.