हिंगणा येथे महाविकास आघाडी वज्रमूठ सभा पूर्वतयारी बैठक.
देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी (नागपूर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- भारतीय जनता पक्षाने भारतीय संविधानाचे लोकशाहीचे हत्या केली असून या देशातील लोकशाही टिकविण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचे संविधानिक अधिकारआभादीत ठेवण्यासाठी 16 एप्रिल ला होऊ घातलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला यशस्वी करण्याचे आव्हान माजी मंत्री सुनील केदार यांनी हिंगणा येथील महाविकास आघाडीच्या पूर्वतयारी बैठकीत केले आहे.
या सभेला संबोधित करताना माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी महाविकास आघाडीचा एकोपा उणे दुणे बाजूला ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकसंघ येऊन सभा यशस्वी करण्याचे आव्हान केले. यावेळी माजी मंत्री तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी आमदार विजय घोडमारे पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते दिनेश बंग, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोक्काडे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, जि. प सभापती अवंतिका लेकुरवाळे, मिलिंद सुटे,राजकुमार कुसुबे, बाळू जोध, राकापा जिल्हा कार्याध्यक्ष राजू राऊत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकुमचंद आमधरे, हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव अव्हाळे, जि. प. सदस्य रश्मी कोटगुले, प. स. सभापती सुषमा कावळे, उपसभापती उमेश राजपूत, विठ्ठल कोहाड, मिथिलेश कनेर आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातून 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार: हिंगणा विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीचे किमान पंचवीस हजार कार्यकर्ते व पदाधिकारी सभेला उपस्थित राहणार असल्याची ग्वाही बैठकीचे मुख्य आयोजक तथा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य संजय जगताप, संचालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष लीलाधर दाभे यांनी तर आभार शिवसेनेचे नेते विलास बोंबले यांनी मानले.
या बैठकीच्या यशस्वीते करिता शिवसेनेचे रवि जोडागळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाडे, पुरुषोत्तम डाखळे, प्रमोद बंग,गुणवंता चामाटे,प्रशांत सोमकुवर, गोवर्धन प्रधान, राकापा मंडळाध्यक्ष प्रदीप कोटगुले, सुशील दीक्षित, विलास वाघ, श्यामबाबू गोमासे, राजू गोतमारे, प्रदीप फलके, विठ्ठल हुलके, निलेश उईके, मीना मेश्राम, नांना शिंगारे, राजा तिवारी, दादाराव इटनकर, समाधान माने, विष्णू कोल्हे, प्रेमलाल चौधरी,मिलिंद कचोरे, विजयलक्षी लाड, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी राज्याचे माजी मंत्री केदार म्हणाले की जो पक्ष संविधान जाळण्याची हिम्मत करतो त्याला आपण सर्वांनी सत्तेपासून हद्दपार करायला हवे या वेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.