इचलकरंजी तालुका प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इचलकरंजी:- चांदणी चौक परिसरात राष्ट्र सेवा दलाच्या स्मिता पाटील कलापथकाने हर घर संविधान पथनाट्य सादर करत केले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतिशील अभिवादन केले.
संजय रेंदाळकर यांनी भीमगीत सादर केले. हर घर संविधान पथनाट्यात संविधानिक मुल्ये आणि कर्तव्ये यांचे सादरीकरण झाले. यामध्ये कलाकार म्हणून दामोदर कोळी, वैभवी आढाव, शरद वास्कर, अमित कोवे, आदित्य धनवडे, प्रफुल्ल आवळे यांनी काम केले. प्रशांत खांडेकर यांनी सूत्रसंयोजन केले. यावेळी अनुभव शिक्षा केंद्रचे जिल्हा प्रशिक्षक अशोक वरुटे, नम्रता कांबळे, साद चांदकोटी, आदिरा यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.