प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उमेश वावरे मित्र परिवारच्या वतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळच्या सुमारास भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. उमेश वावरे (वैज्ञानिक) दिलीपभाऊ कहूरके, मनिष कांबळे, सचिन बुरेभाटे, चिगा बुरेभाटे सह पदाधिकारी कार्यकर्ता मान्यवर उपस्थिति होते.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती धर्माच्या भिंती तोडून तम्माम देशवासीयांसाठी अमूल्य असे कार्य केले. भारतीय संविधानाचे निर्माण करून त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकावर उपकार केले. त्यांच्या दूरदृष्टी मुळे देश आज एकसंध एका धाग्यात गुंफून आहे. त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करून देशाला समोर घेऊन गेले पाहिजे. असे उद्गार यावेळी डॉ. उमेश वावरे (वैज्ञानिक) यांनी प्रतिपादन केले.
त्यानंतर स्थानिक सरकारी दवाखाना चौक येथे भव्य भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेकडो नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी प्रमुख उपस्थिति डॉ. उमेश वावरे (वैज्ञानिक) दिलीपभाऊ कहूरके, मनिष कांबळे, सचिन बुरेभाटे, चिगा बुरेभाटे व सर्व पदाधिकारी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.