विक्की डोके भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- 14 एप्रिल भारतीय घटनेचा शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले याचा स्थानिक निधी मधून दोनाड धम्मदीक्षा बौध्द विहार येथे सभामंडप बांधन्यात येणार आहे. यांच्या बांधकामासाठी अंदाजित खर्च 10 लक्ष येणार असून काल त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
प्रथम भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या भूमिपूजन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या भूमिपूजन कार्यक्रमाचे उदघाटन विशाखा माटे जिल्हा परिषद सदस्य, शिवदास बुरडे, संरपच ग्राम पंचायत दोनाड, सौ.जयमाला ठेंगरी उपसरपंच, विलास पिलारे, मोहरणा, प्रदिप ठेंगरी सदस्य ग्रा. प. ज्योती गजापुरे ग्रा. पं. शेखर डोके, संदीप खोब्रागडे, प्रकाश खोब्रागडे, भारत गेडाम, श्री वैद्यजी, विजय सिव्हागडे ठेकेदार, रवींद्र दामोदर, बगमारे, दिलीप बगमारे, शैलेश नाकाडे, अमर मेश्राम, उमेश खोब्रागडे, दादाराव डोके, रामकृष्ण लांडगे, विक्की सुनील डोके महाराष्ट्र संदेश न्यूज तालुका प्रतिनिधी तथा समस्त दोनाड गावातील नागरिकांची उपस्थिती होती.