सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- गौरक्षण वॉर्ड येथे विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतीमेला क्रिष्णाराव झाडे माजी लोको पायलेट सेंटर रेल्वे यांच्या हस्ते माल्याअर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुने म्हणून चंदनसिह चंदेल, वनविकास मंहामंडळ अध्यक्ष, कांशीनाथ सिंह समाजसेवक, सतवींदर (राजुभैया दारी) समाजसेवक उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जंयतीचे औचित्य साधून यावर्षी खूप उष्णता असल्यामुळे काही गोरगरिबांना गरजू वस्तू वाटप करण्यात आले. उष्णतेचा विचार करून फुटपाथ वर लहान मुले असते त्याचा पायात चप्पल नसतो त्याना चप्पल व टोपी, पाणी पिण्याची बाॅटल देण्यात आली. रोडवरील फिरते रिक्षा चालकाना डुपटे व पाणीची बाॅटल देण्यात आली व संध्यकाळी मसाला भात वाटप करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त करण्यात आलेल्या कार्यात प्रामुख्याने नीरज झाडे अध्यक्ष राज युवा ग्रुप गौरक्षण वार्ड बल्लारपूर, सुरेश खोब्रागडे, सुरेश पुणेकर, संजन निमगडे, गौतम खोब्रागडे, बंडुभाऊ, राहुल फासलवार, गुलाब यादव, रामदास दुयोधन, प्रितसिंह,रवी झाडे, प्रदीप निमगडे, लक्ष्मण कांबळे, शंकर दुयौधन, शांताराम झाडे, बुजाडे काका, विश्वास दुयौधन, मनोज गेडाम, श्रिहरी अचुर, निलेश गेडाम, अमित मेश्राम, सचिन बोगुटावार, तुषार उईके, तिलक सोरते, शैलेश कोवे, विशाल गेडाम, अविनाश जुमडे, करण भडके, रुषी पुणेकर, पवन शेंडे, बाळु खोब्रागडे, सुरेश सातपुते, उज्वल बुजाडे, रोनीत गलगट, रवी बद्दीवार, सुरज चन्ने, अनिल चितावार, किशोर रायपुरे, विजय बोरीकर, रजय शर्मा, विशाल कुभरे, गुड्डुसिंग, मनोज शेंडे, मंगेश जाभुळकर, अर्जुन मेश्राम, शेख सोहेल, शेख फेजु सह वॉर्डातील शेकडो महिला व पुरुष मोठे संख्येने उपस्थित होते.