✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- डॉ. हानेमन यांचा जन्म दिवस जागतिक होमेओपथिक दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयुष विभागात होमेओपथिक दिवस साजरा करण्यात आला. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित जागतिक होमेओपथिक दिन कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी डॉ. हानेमन यांच्या फोटोला हार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी डॉ. प्रविण धमाने, आयुष विभाग प्रमुख डॉ. नखाते आदीची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. तडस यांनी होमेओपथिक उपचार व त्याचे फायदे यावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन होमेओपथिक उपचार पध्दतीचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनुपमा जनईकर यांनी केले तर आभार डॉ. योगिता भेंडे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. लोहकरे, डॉ. शगुपता, डॉ. डोणे, डॉ. माधुरी निमसडकर, डॉ. नम्रता सलुजा, नुरुल हक शेख, डॉ. शंकर तायडे, मनीषा कलवडे, श्याम ठाकरे, अरुणा भागवत व आयुष विभागातील कर्मचारी उपस्थित होते.