महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली (प्रतिनिधी) :- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप भाऊ गवई यांच्या कार्याला प्रेरित होऊन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ. निता संदिप गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील सामाजिक कार्यकर्त्या व तथागत ग्रुपच्या कार्याच्या जोरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारीत झालेल्या रणरागिणी सौ. उषाताई कांबळे यांची तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा पदी निवड करण्यात आली.
सौ. उषाताई कांबळे यांची तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षापदी निवड झाल्यामुळे सांगली जील्हातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तथा तथागत ग्रुप महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश राज्य समस्त पदाधिकारी व सदस्य, महिला आघाडी कार्यकर्ते यांनी पण निवडी बद्दल आनंद व्यक्त केला.