सौरभ वाघमारे पुणे शहर प्रतिनिधी
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. १५/०४/२०२३ रोजी क्लीओज स्पा अॅण्ड सलुन, शॉप नं.८ बीएलए टैन स्क्वेअर्सन १५. फातीमानगर, वानवडी, पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वैश्या व्यवसाय चालत असलेबाबत गोपनीय माहिती प्राप्त झालेने सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे, शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी बनावट गि-हाईक पाठवून खात्री केली असता, नमुद मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने, तात्काळ छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून एकुण ०५ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
स्पा चालक यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरूध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गुरनं. १८५/२०२३ भादवि ३७० ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन स्पा चालक आरोपी व ०५ पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव तसेच सहा पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे, तुषार भिवरकर, रेश्मा कंक, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.