Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

घोडबंदर वासियांना मिळणार समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिव्हलची पर्वणी, ठाण्यात प्रथमच समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 19, 2023
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
घोडबंदर वासियांना मिळणार समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिव्हलची पर्वणी, ठाण्यात प्रथमच समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्री नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
8369205752

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- घोडबंदर वासियांना मिळणार समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिव्हलची पर्वणी.. फ्रेण्ड्स ऑफ पुर्वेश सरनाईक कम्युनिटीच्या माध्यमातून ठाण्यात प्रथमच समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 20 एप्रिल ते 23 एप्रिल 2023 रोजी सायं. 4.00 ते रात्रौ 10.00 वाजे पर्यंत महानगरपालिका मैदान, सरस्वती शाळेजवळ, आनंद नगर, घोडबंदर रोड, ठाणे या ठिकाणी हा फेस्टिव्हलची जादू नागरिक अनुभवणार आहे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला विरंगुळ्याचे व आनंदाचे काही क्षण हवे असतात मग ती व्यक्ती कोणत्याही वयोगटातील असो. हेच लक्षात घेऊन युवासेनेचे नेते श्री. पुर्वेश प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून ठाणे समर वंडरलॅन्ड हा फेस्टिवल करण्याचे ठरविण्यात आले. या कार्यक्रमात लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्ती यात आनंद लुटू शकणार आहे. लहान मुलांकरिता गेम्स, आर्ट वर्कशॉप तसेच कुकींग वर्कशॉप्स राबविले जाणार आहेत. सायंकाळी लाईव्ह म्युझिकचा आनंद सर्वांना अनुभवता येणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध ब्रॅण्ड्सच्या स्टॉल्सची रेलचेल असणार असून खवय्यांसाठी विविध मेजवानीचे स्टॉल्सही असणार आहेत. जेणेकरून आल्हाददायक संगीताचा आनंद घेऊन लज्जतदार खाण्याची मजा सर्वजण लुटू शकणार आहेत. मुलांसाठी एका वेगळ्या गेम झोनची निर्मिती केली जाणार आहे, जिथे लहान मुलं मनसोक्त खेळतील व आनंदाने बागडू शकतील.

या फेस्टिव्हलचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात नागरिकांना आपल्या सोबत आपआपल्या पाळीव प्राण्यांनाही आणण्याची मुभा असून अशा प्राण्यांकरिता विशेष जागा म्हणजेच पेट पार्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच तिथे त्या प्राण्यांच्या ट्रेनिंग व देखभाल करण्यासंबंधीचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

याचबरोबर फिटनेस प्रेमी, कसरत प्रेमी तसेच व्यायाम करणार्यांसाठी एप्रिल व मे महिन्याच्या प्रत्येक रविवारी सकाळी ६ ते ९ या वेळेत रौनक पार्क येथील नवीन रस्त्यावर ’फिट अँड फन, ठाणे“ हा अनोखा उपक्रम ही राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत योगा, कोअर फिट, झुब्बा, सायकलिंग, स्केटींग अश्या विविध व्यायाम प्रकार शिकविले जात आहेत. त्याचबरोबर लहान मुलांकरिता पैंटिंग व कॅलिग्राफीचे वर्कशॉप ही घेतले जात आहेत. सशक्त शरीर, उत्तम शारिरीक व मानसिक आरोग्य जोपासणे याबाबतीत जनजागृती करून नागरिकांमध्ये जास्तीत जास्त व्यायाम व कसरतीकडे वळावे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

अशा प्रकारचा उपक्रम ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असून फ्रेण्ड्स ऑफ पुर्वेश सरनाईक ही कम्युनिटी या कार्यक्रमाचे नियोजन करीत आहे. या कम्युनिटीच्या माध्यमातून रवी घरत, साजन कासार, सोहम सुर्वे, प्रमोद चतुर्वेदी, उमेश गावडे, श्रीनिवासन, सुखप्रीत सिंग, ओमकार कदम, आदेश वाघमारे, क्षितीज कुडीया, अनिकेत कालमाने, नंदिनी शेट्टी, स्वरा मोकाशी आणि सहकारी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रचंड परिश्रम घेत आहेत.

Previous Post

बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटना तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व समाज स्नेहमिलन संमेलन संपन्न.

Next Post

वाशिम तालुक्यातील वीर जवान अमोल गोरे भारत – चीन सीमेवर शहीद, आज झाला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाशिम तालुक्यातील वीर जवान अमोल गोरे भारत – चीन सीमेवर शहीद, आज झाला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वाशिम तालुक्यातील वीर जवान अमोल गोरे भारत - चीन सीमेवर शहीद, आज झाला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In