मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुका अंतर्गत येत असलेल्या व्येंकटरावपेठा येथे गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद तथा अहेरी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी व्येंकाटरावपेठा गावातील वॉर्ड क्र.३ मधील मुख्य चौकात गेल्या आठवड्यात बैठक घेऊन नागरिकांशी विविध समस्या बाबत चर्चा केले होती सदर चर्चात विविध समस्या मांडण्यात आले होते.

यावेळी गावातील नागरिकांनी गांवात माता मंदिर जीर्ण अवस्थेत असल्यामुळे माता मंदिराचा जीर्णउद्धार करून माता मंदिर बांधून देण्यात यावी अशी विनंती केली. याबाबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी माता मंदिराचा जीर्णउद्धार करून देण्याबाबत व्येंकाटरावपेठा गावातील नागरिकांना शब्द दिला होता. यावेळी शासकीय योजनेतून निधी उपलब्ध होत नाही मात्र माझ्या स्व:खर्चतून बांधून देतो असे आश्वासन दिले व माता मंदिर बांधकामास सूरवात करण्यात आली असून यावेळी नागरिकांनी आभार मानले.

